Jio New Recharge Plans Saam Tv
बिझनेस

Reliance Jio New Plans: जबरदस्त! रिलायन्स जिओने युजर्ससाठी आणले 3 नवीन प्लॅन, जाणून घ्या फायदे

Priya More

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणारे नवनवीन प्लॅन नेहमी आणत असते. रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी रिचार्ज प्लॅन महाग केले होते. कंपनीने प्रीपेड, पोस्टपेड आणि डेटा ॲड ऑनसह सर्वांच्या किमती वाढवल्या. या प्लॅन्सच्या किमती वाढवल्यानंतर कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही नवीन प्लॅन देखील आणले आहेत.

रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या रिचार्ज कॅटलॉगमध्ये तीन नवीन प्लॅन्स आणले आहेत. त्यांची किंमत ५१ रुपयांपासून सुरू होते. हे प्लॅन १०१ रुपयांपर्यंत आहे. हे प्लॅन अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहेत ज्यांना फक्त डेटासाठी रिचार्ज प्लॅन करावा लागतो. तिन्ही प्लॅन्समध्ये एक गोष्ट समान आहे की ते सर्व अमर्यादित 5G डेटासह येतात. याशिवाय तिन्ही प्लॅनची वैधता नाही. या प्लॅनची वैधता सक्रिय प्लॅनच्या वैधतेवर अवलंबून असते.

51 रुपयांच्या प्लॅनमध्ये जोपर्यंत तुमचा मुख्य प्लॅन सक्रिय राहतो तोपर्यंत हा प्लॅन कार्यान्वित राहील. यामध्ये यूजर्ससाठी 3GB डेटा रोलओव्हर केला जातो. ज्याचा स्पीड 4G आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे डेटा संपल्यानंतरही यूजर्सना 64Kbps मिळतात. या प्लॅनमध्ये युजर्सला चांगला फायदा मिळणार आहे.

101 रुपयांच्या प्लॅनची मुदत आणि अटी समान आहेत. यामध्ये 4G स्पीडसह एकूण 6 GB डेटा रोलआउट केला जातो. जोपर्यंत युजरचा मुख्य प्लॅन सक्रिय आहे तोपर्यंतच हा प्लॅन सक्रिय राहतो. 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 9 GB 4G डेटा दिला जातो. यासाठीचे नियम वर नमूद केलेल्या प्लॅन्सप्रमाणेच आहेत.

टॅरिफ वाढीबरोबरच रिलायन्स जिओने 5G डेटा वापरण्याचे नियमही बदलले आहेत. पूर्वीप्रमाणे आता सर्वांना अमर्यादित डेटा मिळत नाही. त्याऐवजी ज्यांचे मुख्य प्लॅन 2GB किंवा त्याहून अधिक डेटा प्रदान करते तेच युजर्स याचा लाभ घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT