Reliance Jio: ३३६ दिवस चालणारा स्वस्त रिचार्ज प्लान; डेटा, कॉलिंगसह मिळेल OTT लाभ

Reliance Jio Cheapest Recharge: रिलायन्स जिओचे अनेक प्रकारचे रिचार्ज प्लान आहेत, त्यापैकी एक ३३६ दिवसांचा स्वस्त प्लान आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
Reliance Jio: ३३६ दिवस चालणारा स्वस्त रिचार्ज प्लान; डेटा, कॉलिंगसह मिळेल OTT लाभ
Reliance Jio Cheapest RechargeANI

देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने अनेक प्रकारचे रिचार्ज प्लान आणले आहेत. यात १ दिवस ते १ वर्षाची वैधता असलेले रिचार्ज प्लानचा समावेश आहे. दरम्यान ८४ दिवस वैध असणारा रिचार्ज प्लान बहुतेक ग्राहकांच्या पसंतीस उतरलाय. तुम्ही हा प्लान घेत असाल आणि आता नवीन प्लान घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कंपनीने नवा रिचार्ज प्लान सादर केलाय. यात तुम्ही ३३६ दिवस कॉलिंग, इंटरनेटचा उपयोग करू शकतात.

जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ३३६ दिवसांच्या म्हणजेच सुमारे ११ महिन्यांची वैधता असलेला स्वस्त प्लान आणलाय. सिमनेहमी सक्रिय ठेवण्यासाठी ३३६ दिवसांचा प्लॅन तुमच्यासाठी किफायतशीर ठरू शकतो. जिओचा ८९५ रुपयांचा रिचार्ज प्लान ३३६ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिग, डेली मेसेज, आणि डेटा लाभ मिळतो. तसेच ग्राहकांना या प्लानसह एकूण २४जीबी डेटाचा फायदा मिळतो.

Jio च्या ८९५ रुपयांच्या रिचार्जसह, तुम्हाला दर २८ दिवसांनी २GB डेटाचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे, तुम्हाला दर २८ दिवसांनी ५० एसएमएस करता येतात. ते दर २८ दिवसांनी पुन्हा नव्या घेता येतात. डेटा मर्यादा संपली असेल तर वापरकर्ते ६४Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. तसेच हा रिचार्ज घेतल्यानंतर Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema या ओटीटीचा लाभ आपल्याला मिळत असतो.

सर्व Jio सिम वापरकर्त्यांसाठी हा ८९५ रुपयांचा रिचार्ज प्लान नाहीये. जिओ भारत फोन किंवा इतर कोणताही फोन वापरणाऱ्या ग्राहकांना या प्लानचा लाभ मिळू शकत नाही. हा रिचार्ज प्लान फक्त निवडक JioPhone वापरकर्त्यांसाठी आहे. JioBharat फोन वापरकर्ते 1,234 रुपयांच्या रिचार्जसह या प्लानचा लाभ घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com