Reliance Jio घेऊन येतोय सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; किंमत खिशाला परवडणारी

29 ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) या फोनची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Reliance Jio SmartPhone
Reliance Jio SmartPhoneSaam TV
Published On

मुंबई: रिलायन्स जिओ आता एक सर्वांना परवडणारा 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 5 जीचे कव्हरेज पुरविणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी जिओ हा देखील एक ऑपरेटर असणार आहे.

अशातच आता Jio च्या 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. या 5 जी फोनसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्च कमी ठेवणं हे जिओसाठी अवगड असणार आहे. त्यामुळे या महागाईच्या परिस्थितीमध्ये जिओ आपल्या स्मार्टफोनचे मार्केटिंग कसे करते हे पाहणं महत्वाचं असणारं आहे.

दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) डिव्हाइसची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

जिओ च्या या स्मार्ट फोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया -

Reliance Jio SmartPhone
जिओचा जबरदस्त प्लान, एका रिचार्जमध्ये 4 मोबाइल फोन चालतील; नेटफ्लिक्स-अ‍ॅमेझॉन प्राइम मोफत मिळणार

भारतात Jio च्या 5G स्मार्टफोनची किंमत १२ हजा रुपयांपेक्षा कमी असू शकते. मायक्रोमॅक्स, लावा किंवा कार्बन सारख्या इतर भारतीय कंपन्यांनी अजून पर्यंत त्यांचा 5G फोन बाजारात आणलेला नाही. तर सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनपैकी हा सॅमसंग M13 5G आहे. मात्र त्याची किंमत १३,९९९ रुपये आहे.

कधी होऊ शकतो Jio 5G स्मार्टफोन लाँच?

जिओ आपला हा 5G स्मार्टफोन (Smartphone) आगामी दिवाळी सणाच्या काळात त्याची विक्री होण्याची शक्यता आहे. JioPhone Next देखील मागील दिवाळीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. दरम्यान ही सर्व माहिती लीक झालेल्या सुत्रांकडून मिळत आहे. कंपनीने फोनबद्दल अद्याप काहीही सांगितले नाही.

पाहा व्हिडीओ -

एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, Jio चा 5G स्मार्टफोन अमर्यादित डेटा आणि व्हॉइस कॉलिंग फायद्यांसह बंडल प्लानसह येऊ शकतो. हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 SoC 4GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजसह खेळू शकते. यामध्ये 13MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह 6.5-इंच HD+ IPS LCD डिस्प्ले आणि मागे ड्युअल-कॅमेरा सेटअप असू शकतो. ॉ

याशिवाय सेल्फी कॅमेरा 8MP सेन्सर असू शकतो. डिव्हाइस दोन रॅम प्रकारांमध्ये येऊ शकते - 2GB आणि 4GB. हे प्रगती OS वर चालण्याची शक्यता आहे जी Jio ने JioPhone Next साठी Google च्या भागीदारीत विकसित केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com