Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: इन्कम टॅक्समधील नोकरी धुडकावली,संसार अन् नोकरी सांभाळत UPSC केली क्रॅक; IPS तनुश्री यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IPS Tanushree: आयपीएस तनुश्री यांनी घर अन् नोकरी सांभाळत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

अनेकदा आपली स्वप्ने मोठी असतात. परंतु परिस्थितीमुळे आपण ती स्वप्ने पूर्ण करु शकत नाही. परंतु हीच परिस्थिती बदलवण्याची ताकद आपल्यात असते. त्यावर मात करुन तुम्ही यश मिळवू शकतात.असंच यश आयपीएस तनुश्री यांनी मिळवलं आहे. त्यांनी लग्न झाल्यावर घर आणि नोकरी सांभाळून यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि परीक्षा क्रॅक केली. (Success Story)

आयपीएस तनुश्री यांचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे. आयपीएस तनुश्री यांनी सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून नोकरी सुरु केली. यानंतर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला अन् त्या स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरल्या. घर आणि नोकरी सांभाळून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. (Success Story Of IPS Tanushree)

तनुश्री यांचा जन्म२४ एप्रिल १९८७ रोजी झाली. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण बिहारच्या मोतिहारी शाळेतून केले. त्यानंतर त्यांना १२वीपर्यंतचे शिक्षण केले. बारावीत त्यांना चांगले गुण मिळाले त्यानंतर त्यांचे अॅडमिशन मिरांडा हाउस कॉलेजमध्ये केले. त्यांनी हिस्ट्री ऑनर्समध्ये बीए केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या.

तनुश्री यांची मोठी बहीणदेखील सीआरपीएफ कमांडंट आहेत. त्यांनादेखील वर्दी घालायची होती. त्यांचे वडील सीआरपीएफमधून डीआयजी निवृत्त होते. त्यामुळे त्यांना सीआरपीएफ ऑफिसर व्हायचे होते आणि त्यांनी ती परीक्षा क्रॅकदेखील केली.

तनुश्री यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचीदेखील परीक्षा पास केली. परंतु त्यांनी तिथे जॉइन केले नाही. यानंतर २०१५ मध्ये तनुश्री यांनी लग्न झाले. लग्न झाल्यानंतर सर्व सुरळीत चालू असतानाही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

तनुश्री यांनी घर आणि नोकरी सांभाळून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी २०१७ मध्ये परीक्षा क्रॅक केली अन् आज आयपीएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT