RBI
RBI  Saam Tv
बिझनेस

Abhyudaya Cooperative Bank: आरबीआयची मोठी कारवाई; अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ केलं बरखास्त, कारण काय?

Vishal Gangurde

Abhyudaya Cooperative Bank Crisis News:

भारतातील सहकारी बँकांचं संकट अद्याप संपेना. पीएमसी बँकेनंतर आता अभ्युदय सहकारी बँकेचं नाव कारवाईमुळे चर्चेत आलं आहे. रिझर्व्ह बँकेने अभ्युदय सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं आहे. त्यानंतर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. आरबीआयने कारवाई केल्याने अभ्युदय बँकेच्या खातेदारांमध्ये चिंता पसरली आहे. (Latest Marathi News)

रिझर्व्ह बँकेने अभ्युदय सहकारी बँकेवर कारवाई करत संचालक मंडळ बरखास्त केलं आहे. आरबीआयने कारवाई केल्यानंतर प्रशासक नेमला आहे. आरबीआयने प्रशासक म्हणून स्टेट बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची नेमणूक केली आहे. तर प्रशासकाला मदतीसाठी एक तीन सदस्यांची सल्लागर समिती नेमली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभ्युदय बँकेत प्रशासकीत कामकाजात अनियमितता आढळल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. बँकेची आर्थिक स्थिती ठीक आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना कुठलाही त्रास होणार नसल्याचे बोललं जात आहे.

या बँकेवर एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या काळात बँकेला कुठलीही नवी शाखा काढता येणार नाही. तसेच या काळात बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत चालतील, त्यामुळे बँकेच्या खातेधारकांनी घाबरून जाऊ नये असं आरबीआयने म्हटलं आहे.

बँकेचा व्यवहार सुरळीत

आरबीआयकडून अभ्युदय सहकारी बँकेचं संचालक मंडळ शुक्रवारी बरखास्त करण्यात आलं. आरबीआयने संचालक मंडळ एका वर्षासाठी बरखास्त केलं आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर बँकेचा व्यवहार सुरळीत चालणार आहे. आरबीआयने कारवाईनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे.

प्रशासकाहित सल्लागारांची समितीही नेमली

प्रशासकाहित सल्लागारांची समिती नेमण्यात आली आहे. सल्लागार समिती प्रशासकाला कामात मदत करणार आहे. या समितीत एसबीआयचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, सीए महेंद्र छाजेड आणि कॉस्मोस सहकारी बँकेचे लिमिटेड माजी व्यवस्थापकीय संचालक महेंद्र गोखले यांचा सामावेश करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rrichest Thief: अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!

Special Report : खेळाडूंना 11 कोटी, शेतकऱ्यांना काय? क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची उधळण; वडेट्टीवार, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Assembly Bypoll 2024: पुन्हा NDA विरुद्ध INDIA आघाडी! 7 राज्यांच्या 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक, काय आहे राजकीय समीकरण?

Marathi Live News Updates : विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक

Special Report: Paper Plate: KEM रुग्णालयात पेपर प्लेट बनविण्यासाठी रुग्णांचे रिपोर्ट कार्ड? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT