देशात होळीचा सण साजरा केला जात आहे. या होळी सणात एकमेकांना रंग लावत असतात. महाराष्ट्रातील अनेक भागात धुलिवंदनला आणि रंगपंचमीला रंगाचा सण साजरा करतात. पाण्याचा रंग खेळल्याने कपडे खराब असतात शिवाय नोटांसुद्धा रंग लागण्याची शक्यता असते. बहुतेकजण आपल्या शर्टच्या खिश्यात पैसे ठेवतात. त्यात जर कोणी पाण्याचा रंग अंगावर फेकला तर नोटांना रंग लागण्याची शक्यता असते. नोटांना रंग लागल्याने अनेक दुकानदार त्या नोटा घेत नाहीत.(Latest News)
यासंदर्भात आरबीआयचा काय नियम आहे ते जाणून घेऊ. आरबीआयच्या नियमानुसार कोणताही दुकानदार रंगीत नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही.होळीच्या वेळी पाणी पडल्याने नोटा फाटल्या तर तो चिंतेचा विषय बनतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार देशभरातील सर्व बँकांमध्ये दुमडलेल्या आणि जुन्या नोटा बदलून घेता येतात. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.
ज्या नोटा बदलायच्या आहेत त्यांची स्थिती पाहून त्या नोटा बदलल्या जातात. उदाहरणातून आपण हा नियम समजून घेऊ. जर तुमच्याकडे २०० रुपयांची नोट आहे. ही नोटेचा ७८ भाग फाटला असेल तरी ही नोट बँकेत बदलून मिळत असते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२००० रुपयांची नोटची काय आहे अपडेट
दोन हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्यात आल्याने आरबीआयने नागरिकांकडे असलेल्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितलं होतं. आतापर्यंत २ हजार रुपयांच्या ९७.६२ टक्के नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. आता फक्त ८,४७० कोटी रुपये लोकांकडे आहेत. आरबीआयने १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. आरबीआयने नागरिकांकडे असलेल्या नोटा बँकेत जमा करण्याची सूचना दिल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.