KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

KDMC News : केडीएमसीतील वादग्रस्त कचरा संकलनाचा कोट्यावधी रुपयांच्या ठेक्यासंदर्भात नियुक्त केलेला ठेकेदार किती रकमेचा ठेका दिला याची कोणतीच माहिती सादर करता आली नसल्याने राज्य अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी...
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

3200 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या केडीएमसीत आंधळे दळते कुत्र पीठ खाते अशी परिस्थिती

अनुसूचित जाती जमतीच्या आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी KDMC अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

करोडो रुपयांचे प्रकल्प पण विचारणा केलेली कोणतीच माहिती देण्यासअधिकारी असक्षम अहवाल आल्यानंतर कारवाई करणार-आयोगाचा इशारा

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

Kalyan : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील घनकचरा आणि व्यवस्थापनातील बहुचर्चित कचरा संकलनाचा कोट्यावधी रुपयांचा देण्यात आलेल्या ठेका संदर्भात राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी केडीएमसी प्रशासनाकडून माहिती घेतली. त्यावेळी सदरच्या ठेक्यासंदर्भात नियुक्त केलेला ठेकेदाराला एम.ए.यू आणि कोणत्या पी.एम.सीला नियुक्त करून किती रकमेचा ठेका दिला, याची कोणतीच माहिती पालिका अधिकाऱ्याकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याचे राज्य अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष धम्मपाल मेश्राम यांनी सांगितले. या ठेक्याबाबत प्रशासनाकडे माहिती असेलही त्याबद्दल मी खोलात जाणार नाही, अशी संशयाची सुई रोखल्याने पालिकेतील वादग्रस्त करसंकलनचा ठेका या निमित्ताने पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्य अनुसूचित जाती जनजाती आयोगा संबंधित विषयाची तपासणी करणे,माहिती घेणे ,काही सुधारणा असल्यास सूचना आदी संदर्भात अनुसूचित जाती जमतीच्या आयोगाचे उपाध्यक्ष धम्मपाल मेश्राम यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला भेट दिली होती या भेटी दरम्यान आयोजित केलेल्या बैठकीत पालिका आयुक्त,अतिरिक्त आयुक्त ,उपआयुक्त यांच्या सह पालिकेच्या सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Kalyan News
Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; अहिल्यानगरमधील शिलेदार कार्यकर्त्यांसह ओवेसींना साथ देणार

आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम यांनी सवच विभागाची तपशील माहिती घेतली, तब्बल साडे पाच तास चाललेल्या बैठकीत पालिका प्रशासनातील मोठ्या प्रमाणावर सावळागोंधळ त्यांना दिसून आला. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम यांनी सांगितले की, ३२०० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या केडीएमसीकडे अपेक्षित असलेला डेटा पालिकेकडे उपलब्ध नसल्याने महापालिकेची अवस्था आंधळे दळते कुत्र पीठ खाते अशी परिस्थिती असल्याची टीका केली.

Kalyan News
IPS अधिकाऱ्याने आयुष्य का संपवलं? ९ पानी चिठ्ठीतून झाला धक्कादायक उलगडा

पालिकेकडे अपेक्षित असलेला डेटा त्या पद्धतीचे रजिस्टर त्यांना बैठकीत मिळाले नाहीत. पालिकेतील प्रशासकीय कामकाजी संदर्भात संशय व्यक्त करीत अशा पद्धतीने काम करणे कामचुकारपणाचा दुसरा भाग आहे. तसेच कोणत्याही पद्धतीची आयोगासमोर माहिती सादर न करू शकणे ही मनपाच्या प्रशासकीय यशस्वितेच्या दुष्टीने आणि या मनपाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या दुष्टीने चुकीची असल्याची प्रथमदृष्ट्या मत झाल्याचे सांगितले. मनपातील तीन वॉर्डातील तीनशे कर्मचारी असणे या तीनशे कर्मचाऱ्याचा पगार कोणत्या पद्धतीने करतो त्याचा डेटा नसणे त्याचे इएसआयसी तसेच इपीएफ नंबर त्याच्या याद्या नसणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले.

Kalyan News
Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीचा वापर होतो का नाही , दिव्यांगासाठी असलेल्या निधीचा वापर कोणत्या पद्धतीने झाला याचा दिव्यांगांना काय फायदा झाला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध विकासकामन बद्दलचा आढावा निधीचा वापर याबाबत विचारलेली माहिती देण्यास केडीएमसीच्या संबंधित विभागाचे अधिकारी असमर्थ ठरल्याने पालिका अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले . कोटी रुपयांचे प्रकल्पाबाबत  विचारणा केलेली कोणतीच माहिती देण्यास अधिकारी असक्षम असल्याने या प्रकरणी केडीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अहवाल मागवला असून या अहवालानंतर केडीएमसीवर निश्चित कारवाई करण्यात येईल असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com