
IPS वाय. पूरन कुमार यांनी चंडीगडमध्ये केली आत्महत्या
९ पानी चिठ्ठीत इतर आयपीएस अधिकाऱ्यांची नावे
भ्रष्टाचार प्रकरणामुळे होते मानसिक दबावात
या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू
हरियाणातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आयपीएस वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. IPS पूरन कुमार यांच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी ९ पानी चिठ्ठी सापडली आहे. त्यांनी लिहिलेल्या ९ पानी चिठ्ठीतून खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पूरन कुमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत एक आयपीएस अधिकारी आणि दोन माजी आयपीएस अधिकाऱ्यांचा नावाचा समावेश आहे. आयपीएस पूरन कुमार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराशी संबंधित एक एफआयआर नोंदवण्यात आला होता. याच प्रकरणात त्यांना अडकण्याची भीती होती. चंडीगढ पोलिसांनीही या प्रकरणाचा तपासाचा वेग वाढवला आहे. गेल्या काही वर्षांपासून वाय पूरन कुमार हरियाणा पोलीस दलात काम करत होते.
पूरन कुमार यांचा मृतदेह हा चंडीगढच्या सेक्टर-१६ मेडिकल कॉलेज रुग्णालयात पोस्टमार्टम पाठवण्यात आला आहे. रुग्णालयाचे अधिकारी सुमन सिंह यांनी सांगितलं की, डॉक्टरांची एक टीम पोस्टमार्टम करणार आहे. चंडीगडचे एसएसपी कंवरदीप कौर यांनी घटनास्थळाचं तपासणी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोणीही अधिकृत टिप्पणी करण्यात आलेली नाही.
वाय पूरन कुमार यांनी चंडीगडच्या सेक्टर ११ येथील ११६ नंबरच्या घरात आत्महत्या केली. ते पत्नी आणि दोन मुलीसोबत राहत होते. त्यांची मुलगी शिक्षणासाठी चंडीगढला होती. पूरन कुमार यांची मुलगी उच्च शिक्षण घेत आहे. तर लहान मुलगी त्यांच्याजवळ राहत होती.
पूरन कुमार यांनी घरातील एका खोलीत आत्महत्या केली. गोळ्या झाडल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील एका खोलीत त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं. या घटनेनंतर मुलीने त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.