Manoj Jarange : 'मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा'; कुणी केली सरकारकडे मागणी? VIDEO

Manoj Jarange News : मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणीच ओबीसी नेत्यांनी केलीय... मात्र त्याचं कारण काय? आरक्षणाचा वाद आता मुद्द्यावर कशा प्रकारे गुद्द्यावर आलाय? आणि या वादात जातीय सलोखा कसा जळून खाक होतोय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Maratha Reservation Manoj Jarange patil
Maratha Reservation Manoj Jarange patilSaam
Published On

मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद आता मुद्यावरून गुद्दयांवर आलाय..कारण मराठा आरक्षणाला विरोध कऱणाऱ्या नेत्यांची कारकीर्दच उद्ध्वस्त करणार असल्याचा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय.. आणि त्यावरुन हैदराबाद गॅझेटियरला पाठींबा देणारे ओबीसी नेते बबनराव तायवाडे आक्रमक झालेत.. त्यांनी थेट जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.. तर तायवाडेंच्या टीकेनंतर जरांगेंनी थेट 2 वर्षापुर्वीच्या अंबडच्या सभेचा दाखला देत भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..

Maratha Reservation Manoj Jarange patil
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ठाणे जिल्ह्यातील बडा नेता अजित पवारांच्या गळाला

मात्र हा संघर्ष पेटला तो काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी हैदराबाद गॅझेटियरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबरला आंदोलन करण्याचं आयोजन केल्यानं... वडेट्टीवारांनी ओबीसींच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी आंदोलनाचा नारा दिला आणि हेच मनोज जरांगेंच्या जिव्हारी लागलं.. त्यामुळे जरांगेंनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी समाजाच्या नेत्यांचं कारकिर्दच उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिलाय.

दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांनीही जरांगे मराठा समाजाचे नाही तर वाळू चोरांचे नेते आहेत, असा टोला हाणलाय.

Maratha Reservation Manoj Jarange patil
Shocking : अतिरिक्त पोलीस महासंचालकांची आत्महत्या, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत जपान दौऱ्यावर, पोलीस दलात खळबळ

राज्यात वर्षानुवर्षे मराठा आणि ओबीसी समाज गुण्यागोविंदाने राहतोय.. मात्र आरक्षणाच्या वादामुळे दोन्ही समाजात जातीय विष पेरलं जातंय.. नेत्यांकडून भडकाऊ वक्तव्य केली जात आहेत.. त्यामुळे अशी वक्तव्य करुन जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कुणी कारवाई करणार का..? या वक्तव्यांच्या धगीत जातीय सलोखा जळून खाक होणार हे मात्र निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com