Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; अहिल्यानगरमधील शिलेदार कार्यकर्त्यांसह ओवेसींना साथ देणार

Ahilyangar news : अहिल्यानगरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. शिलेदार कार्यकर्त्यांसह ओवेसींना साथ देणार आहेत.
Ahilyangar news update
Maharashtra PoliticsSaam tv
Published On
Summary

ओवेसींची सभा गुरुवारी अहिल्यानगरमध्ये होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक AIMIM मध्ये प्रवेश करणार

29 सप्टेंबर रोजी झालेल्या दगडफेकीनंतर झाली होती सभा रद्द

मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने ओवेसींचं भाषणाकडे साऱ्यांचं लक्ष

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगरमध्ये ओवेसींची उद्या गुरुवारी सभा होणार आहे. ओवेसींच्या या सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. 29 तारखेला घडलेल्या दगडफेक आणि पोलीस लाठीचार्जनंतर ओवेसी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Ahilyangar news update
Shirdi Politics : ४ वर्षांपासून प्रचार, ऐनवेळी नगराध्यक्षपदाचे आरक्षण SCसाठी जाहीर; साईबाबांच्या शिर्डीत दिग्गजांचा हिरमोड

अहिल्यानगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदउद्दीन ओवेसी यांची सभा उद्या गुरुवारी अहिल्यानगरमध्ये होणार आहे. याआधी 29 सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीचार्जच्या घटनेनंतर 30 सप्टेंबरची नियोजित सभा रद्द करण्यात आली होती. त्या घटनेनंतर पुन्हा एकदा ओवेसींची सभा होतेय.

Ahilyangar news update
Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

या सभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि काही सामाजिक कार्यकर्ते AIMIM मध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 29 सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यानंतर आणि पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेकांना अटक झाल्यामुळे शहरात एकप्रकारे तणावपूर्ण शांततेचं वातावरण निर्माण झालं होते.

Ahilyangar news update
...तर एकही विमान उडू देणार नाही; नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर भूमीपूत्रांकडून घोषणाबाजी

या पार्श्वभूमीवर ओवेसी उद्या काय बोलतात, ते या घटनेवर आणि मुस्लिम समाजाच्या भावना व्यक्त करताना काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरंतर ओवेसी हे प्रक्षोभक भाषण करत असल्याने नगर शहरात वातावरण खराब होणार अशी चर्चा होत आहे. यावर असदुद्दीन ओवैसी हे संविधानाच्या चौकटीत राहून बोलणारे व्यक्तिमत्व असून मतांच्या ध्रुवीकरणासाठी त्यांना बदनाम करण्यात येतं असल्याची भूमिका जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com