
हे मग्रुरीचं वक्तव्य आहे. वकील राकेश किशोरचं ... सर्वोच्च न्यायालयात देशाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न राकेश किशोरनं केला... मात्र या हल्ल्यानंतरही राकेश किशोर यानं केलेल्या विधानामुळे समाजातून संताप व्यक्त केला जातोय...हे प्रकरण नेमकं काय आहे? ते पाहूया..
16 सप्टेंबरला सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं मध्य प्रदेशातील खजुराहोतील एका मंदिरात भगवान विष्णूच्या मूर्तीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात नाही, तर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकारक्षेत्रात येतं, असंही खंडपीठानं स्पष्ट केलं होत. मात्र त्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशाचं एक विधान वकील राकेश किशोर यांना खटकलं आणि तब्बल 20 दिवसांनंतर राकेश यांनी ठरवून सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न केला...
दरम्यान सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियानं राकेश किशोर याचं निलंबन केलयं... तसचं देशात ठिकाठिकाणी सरन्यायाधीवरील हल्ल्याचा निषेध केला जातोय..
अमरावती काँग्रेसचं हल्ल्याच्या निषेधात आंदोलन
- धाराशिवमध्ये सामाजिक संघटनांकडून निषेध
- अमरावतीत वकील संघाची निषेध सभा
- मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं निषेध आंदोलन
दरम्यान राजकीय नेत्यांनीही सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावर कठोर शब्दात टीका केलीय. राकेश किशोर याच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना कुठलीही तक्रार आली नसल्यानं आरोपी राकेश किशोरची पोलिसांनी सुटका केलीय.
वकील राकेश किशोरच्या विरोधात नोव्हेंबर 2021 मध्ये ही एका ज्येष्ठ नागरिकावर कथित हल्ला केल्याचीही तक्रार आहे.. मात्र सर्वोच्च न्यायालयातच वकिली करणाऱ्या एका वकिलानं मत न पटल्यानं देशाच्या सरन्यायाधीशांवर जाणीवपूर्वक केलेला हा हल्ला निषेधार्हच आहे...आणि असं कृत्य करणाऱ्याला वेळीच शासनही करायला हवं..परमात्माच्या नावाखाली अशा वृत्ती समाजात फोफावण्याआधीच त्यांना पायबंद घालायला हवा..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.