Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Solapur News : ऐन दिवाळीच्या तोंडावर समर्थ सहकारी बँकेच्या ठेवीदारांवर आभाळ कोसळलंय...कारण रिझर्व्ह बँकेने कठोर निर्बंध लादलेत... मात्र समर्थ सहकारी बँकेवर निर्बंध का लावण्यात आले? आणि या निर्बंधांचा ठेवीदारांवर कसा परिणाम होणार? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...
RBI
RBISaam Tv
Published On

हा संताप आणि ही गर्दी आहे सोलापूरातील समर्थ सहकारी बँकेच्या ठेवीदारांची.. कष्टाने पै पै जमवून बँकेत ठेवलेले स्वतःचेच पैसे आता खातेदारांना काढता येत नाहीत... कारण रिझर्व्ह बँकेने समर्थ सहकारी बँकेवर निर्बंधांची कुऱ्हाड चालवलीय... त्यामुळंच खातेदारांची दिवाळी अंधारात जाणार आहे.. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झालेत...

समर्थ सहकारी बँकेची आर्थिक शिस्त बिघडली होती. ठेवीदारांच्या हिताचं रक्षण केलं नाही. तसंच संचालक मंडळाला सुधारण्याची संधी देऊनही सुधारणा न केल्यानं रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी कठोर निर्बंध लादलेत... आता ठेवीदारांची जमापूंजी पणाला लागलीय त्यामुळं ठेवीदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे..

RBI
Thursday Horoscope : अडचणीत सापडण्याची शक्यता, वेळेला हात द्यायला कोणी येणार नाही; तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

आता या बँकेवर निर्बंध घातल्याने त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे? पाहूयात...

रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे बँकेला नवीन कर्ज देता येणार नाही..नवीन ठेवी ठेवता येणार नाही. खातेदारांना त्यांचे पैसे देता येणार नाहीत. फक्त पगार, वीजबील, घरभाडं, वैद्यकीय खर्चासाठी पैसे काढण्याची मुभा देण्यात आलीय.. तर बँकेचे स्थिती सुधारली नाही तर ठेवीदारांच्या रकमेपैकी केवळ 5 लाख रुपयापर्यंतचे पैसेच परत मिळण्याची शक्यता आहे.. त्यामुळं ठेवीदारांच्या डोक्यावर पैसे बुडण्याची टांगती तलवार आहे

RBI
Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; अहिल्यानगरमधील शिलेदार कार्यकर्त्यांसह ओवेसींना साथ देणार

दुसरीकडे संचालक मंडळाने मात्र ही कारवाई तात्पुरती आहे. बँकेला प्रगतीच्या मार्गावर पुन्हा आणू असा विश्वास व्यक्त केलाय. खरंतर गेल्या 30 वर्षात राज्यात 165 सहकारी बँका दिवाळखोरीत निघाल्यात.

त्यामुळं जमापुंजीच पणाला लागल्यानं कित्येक ठेवीदारांनी आपलं जीवन संपवलंय.. त्यामुळे सहकारी बँकांवर दिवाळखोरीची वेळ आणून ठेवीदारांच्या गळ्याला फास लावणाऱ्या संचालक मंडळावर आणि बँक खड्ड्यात जात असताना त्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com