
आजचे पंचांग
गुरुवार,९ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष.
तिथी-तृतीया २२|५५
नक्षत्र-भरणी
रास-मेष २५|२३ नं. वृषभ
योग-वज्र
करण-वणिज
दिनविशेष-१३ प.चांगला
मेष - "धुंदीत राहू मस्तीत गाऊ" असा दिवस आहे. एकूणच आनंदाने बहर येणार आहे. स्वतःसाठी आवडीच्या गोष्टी करण्यात दिवस व्यस्त आहे. मात्र आपल्या बोलण्यामुळे इतर कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ - "धरण उशाशी कोरड घशाशी" अशी काही अवस्था होईल. अडचणीच्या काळात आपल्या लोकांनी मदतीला यावं असं वाटत असताना सुद्धा हात पुढे येणार नाहीत. खर्चाला मात्र आपला हात मोठा राहील.
मिथुन - कुटुंबीयांतील एखाद्या व्यक्तीची आजारपणात आज काळजी घ्यावी लागेल. याच बरोबरीला सामाजिक उपक्रमात सुद्धा सहभागी व्हाल. नव्याने परिचय आणि ओळखी होण्याचा दिवस आहे.
कर्क - "छबीदार छबी मी तोऱ्यात उभी" असे कार्यक्षेत्र आज तुमचे असेल. प्रशंसा मिळेल. केलेल्या कामाचे ऍप्रिसिएशन झाल्यामुळे उत्साह वाढे. जवळच्या लोकांच्या कडून शाब्बासकीची थाप मिळेल. कामात नव्याने संधी मिळतील.
सिंह - "देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा" आपल्या राशीला थोडे वेगळेपण असले तरी आज दिवस अध्यात्मात घालवावासा वाटेल. भाग्यकारक घटना घडतील. दानधर्म आणि उदारता वाढेल.
कन्या - "काटा रुते कुणाला" अशी भावना येईल. वेळेला हात द्यायला तर कोणी येत नाही मात्र अडचणी पुढे उभे टाकण्यात आपलेच लोक असतात, हे समजून मन उद्विग्न होईल.एकटेच राहून अनेक कामे करावी लागतील. हिशोबाला आज चोख रहा. कुठेही साक्षीदार राहू नका.
तूळ - "अरे संसार संसार जसा चुल्हा तव्यावर" व्यवसायिक आणि संसारिक जबाबदाऱ्या आपल्याला आज पेलाव्या लागतील. कामांमधील व्यस्तता वाढेल. नव्याने निर्णय होतील. पुढील कामाचे आयोजन नियोजन उत्तम राहील.
वृश्चिक - झुक झुक गाडी प्रमाणे आयुष्य संथ चालू आहे असे जाणवेल. घ्यावी वाटली भरारी तरी आज अडचणी आणि शत्रूंच्या कारवाया वाढतील. तरीसुद्धा सगळ्यांना पुरून उराल असा दिवस आहे.
धनु - "भेटी लागे जीवा लागलीसे आस" उपासनेला दिवस खास आहे. खास दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे. धनयोग उत्तम आहेत. एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये पाऊल राहण्याचा आजचा दिवस आहे.
मकर - ससा आणि कासवाच्या गतीसारखे आपले आयुष्य आहे. धीम्या चालीने जाता. पण विजय मिळवता. आज वाहनसौख्य, गृहसौख्य सगळे भरभरून मिळणार आहे आणि अनेक दिवस वाट पाहत असणाऱ्या गोष्टी आज सहज होतील.
कुंभ - एखाद्या गोष्टीत समरसून, जीव ओतून काम कराल. पराक्रमांची शर्थ कराल. यश खेचून आणाल असा दिवस आहे. स्वतःवर गर्व वाटेल अशा गोष्टी घडतील. जवळचे प्रवास होतील.
मीन - "लक्ष्मी येई घरा" हे वाक्य आज खरे ठरेल. गुंतवणुकीचे व्यवसाय, वारसा हक्काचा पैसा, मेहनतीने कष्टांने मिळालेल्या पैशाची आवक जवळ सुद्धा चांगली राहील. कुटुंबीयांचा सहकार्याने पुढे जाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.