Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Rohit Sharma Weight Loss : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी रोहित शर्माने वजन कमालीचे कमी केले आहे. टीम इंडीयाच्या या हिट मॅनने स्वत:मध्ये खूप मोठा बदल घडवून आणलाय. पाहूया एक रिपोर्ट...
Rohit Sharma
Rohit Sharmax
Published On

Rohit Sharma Photos : हा फोटो पाहा...दचकलात ना....आश्चर्य वाटलं असेल की हा आपल्या मुंबईचा रोहित शर्माचं आहे का की त्याची AI जनरेटेड इमेज... पण हा आपला हिटमॅन अर्थात रोहित शर्माच आहे... एरवी रोहित शर्मा म्हटलं की वाढलेलं वजन, थोडसं सुटलेलं पोट अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते... पण आता हिटमॅन फिटमॅन झालाय... रोहित शर्माने स्वत:मध्ये कमालीचा बदल घडवत टीकाकारांना सणसणीत उत्तर दिलं आहे... रोहितने आपलं वजन तर घटवलंच आहे शिवाय त्याचं पोटही एकदम सपाट झालंय...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी एकदिवस सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली होती. यावेळी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आणि याला कारण होतं, भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या रोहित शर्मा याची कर्णधारपदावरुन करण्यात आलेली उचलबांगडी... प्रशिक्षक गौतम गंभीरने रोहितच्या जागी शुभमन गिलला कर्णधारपदाचा मुकूट सोपवला होता.. यासाठी रोहित शर्माचं वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट याकडे बोट दाखवलं जात होत..

Rohit Sharma
IND Vs PAK मध्ये राडा! डोळे वटारुन पाहिले, खुन्नस दिली; भारताची कर्णधार पाकिस्तानी खेळाडूला भिडली

मात्र रोहित शर्माने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलंय, त्याने तब्बल 10 किलो वजन घटवलंय... मुंबईत मंगळवारी सीएट क्रिकेट पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी ब्लेझर घालून आलेल्या रोहित शर्माला पाहून अनेकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो एकदम स्लिम ट्रिम दिसत होता. रोहितने कठोर मेहनत घेऊन वजन कमी करुन आपली इमेज बदलवली आहे. रोहित शर्मा 38 वर्षांचा आहे. त्याच्या कारकीर्दीचा उतरणीचा काळ सुरु झाला आहे. 5 फूट 7 इंच उंच आणि मैदानावर घाम गाळणारा हा क्रिकेटपटू आणखी उत्तम खेळीसाठी सज्ज झाला आहे.

Rohit Sharma
IND Vs PAK सामना 'या' हल्ल्यामुळे थांबला, स्टेडियम धुराने भरले; पाहा नेमकं काय घडलं? VIDEO

रोहित शर्मा शेवटचा एकदिवसीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला होता. आता सात महिन्यांनी तो पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे... भारतीय संघाला अनेक जेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहितला तडकाफडकी कर्णधारपदावरुन दूर करणे क्रिकेटप्रेमींना रुचलेलं नाही. पण रोहितने स्वत:त बदल घडवत अजूनही आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी फिट असल्याचं दाखवून दिलंय..

Rohit Sharma
IND Vs PAK : टीम इंडियाची मोठी फसवणूक, मॅच रेफरीने पाकिस्तानला जिंकवलं; नेमकं काय घडलं? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com