Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

Maratha vs OBC Quota Row : अजित पवारांनी साप पोसलेत, असं म्हणत जरांगेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय... जरांगेंनी पवारांवर निशाणा का साधलाय? आणि या आरोप-प्रत्यारोपांमुळे कसं राजकारण तापलंय?
chhagan bhujbal ajit pawar
chhagan bhujbal ajit pawarx
Published On

अजित पवारांनी साप पोसलेत, अशा शब्दात मनोज जरांगेंनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय.. आणि त्याला कारण ठरलंय अजित पवारांनी पक्षाच्या बैठकीत भुजबळांच्या भुमिकेवर व्यक्त केलेली नाराजी... मंत्री छगन भुजबळांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत मांडलेल्या भुमिकेवरुन पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रात्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. काही नेते विशिष्ट जातीबद्दल टोकाची भूमिका घेतात.. त्यामुळं या नेत्यांचं मत हे पक्षाचं मत असल्याची चुकीची प्रतिमा बनते... त्याची पक्षाला किंमत मोजावी लागते, अशा शब्दात अजित पवारांनी भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त केली..

chhagan bhujbal ajit pawar
Maharashtra Politics : कोल्हापुरात शिंदे गटाला मोठा झटका! बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

हाच धागा पकडून अजित पवारांनी नेते नाही तर साप पोसलेत, अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांसह मुंडेंवर निशाणा साधलाय..एवढंच नाही तर बीडमध्ये होणारा ओबीसींचा मेळावा अजित पवार पुरस्कृत असल्याची टीकाही जरांगेंनी केलीय..

दुसरीकडे जरांगेंकडून ओबीसी नेत्यांना पाडण्याचा वारंवार इशारा दिला जात असतानाच भुजबळांनीही आझाद मैदानातून जशास तसं उत्तर देण्याची भाषा केलीय...

chhagan bhujbal ajit pawar
Shamrao Ashtekar : माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांचे निधन, शरद पवारांचा निष्ठावंत सहकारी हरपला

आतापर्यंत जरांगेंकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली जात होती.. मात्र जरांगेंनी आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वळवल्याने त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसणार की ओबीसी मतांच्या धृवीकरणामुळे फायदा होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

chhagan bhujbal ajit pawar
Maharashtra Politics : कोकणात मोठा उलटफेर! ठाकरे गटाला फटका, बड्या नेत्याचे कट्टर समर्थक फोडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com