Maharashtra Politics : कोकणात मोठा उलटफेर! ठाकरे गटाला फटका, बड्या नेत्याचे कट्टर समर्थक फोडले

Maharashtra Political News : कोकणामध्ये ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेते, पदाधिकारी ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गट, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On
Summary
  • योगेश कदमांचा ठाकरेंना मोठा झटका

  • काका सदानंद कदमांचे समर्थक फोडले

  • तळकोकणामध्ये ठाकरे गटाला गळती

Maharashtra : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते रामदास कदम यांच्या आरोपांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. या प्रकरणामुळे शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला आहे.

दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना गळती सुरु असल्याचे म्हटले जात आहे. राजन तेली यांनी ठाकरे गटातून शिंदेसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी धक्का होता. यानंतर आता योगेश कदम यांनीही ठाकरेसेनेला धक्का दिला आहे.

Maharashtra Politics
Cricketer Death : पहिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या महान क्रिकेटपटूचे निधन

ठाकरे गटाचे नेते सदानंद कदम हे रामदास कदम यांचे बंधी आहेत. पण दोन्ही कदम बंधू हे एकमेकांचे कट्टर विरोधी आहेत. दोघांमधील वैमनस्य सर्वश्रुत आहे. दोन वेळा पंचायत समिती सदस्य असलेल्या योगिता बांद्रे आणि प्रकाश सकपाळ हे सदानंद कदम यांचे कट्टर समर्थक आहेत. या दोघांना शिंदेसेनेमध्ये आणून योगेश कदम यांनी मोठी खेळी कली आहे.

Maharashtra Politics
IND Vs PAK मध्ये राडा! डोळे वटारुन पाहिले, खुन्नस दिली; भारताची कर्णधार पाकिस्तानी खेळाडूला भिडली

याआधी अमरीश हेदुकर हे शिवसेनेमध्ये सामील झाले होते. आता सदानंद कदम यांचे दुसरे सहकारी प्रकाश सकपाळ देखील शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. सलग धक्क्यांवर धक्के बसत असल्याने आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणूकींपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरु असल्याची मोठी चर्चा कोकणात सुरु आहे.

Maharashtra Politics
IND Vs PAK सामना 'या' हल्ल्यामुळे थांबला, स्टेडियम धुराने भरले; पाहा नेमकं काय घडलं? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com