Maharashtra Politics : कोल्हापुरात शिंदे गटाला मोठा झटका! बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Political News : कोल्हापुरात शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On
Summary
  • राजेखान जमादार हे रणजितसिंह पाटील यांच्यासह राष्ट्रवादीत करणार प्रवेश

  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत हसन मुश्रीफ गटात जाणार असल्याची घोषणा

  • जिल्हाप्रमुखाने साथ सोडल्याने शिवसेना शिंदे गटाला बसणार मोठा झटका

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह पाटील यांच्यासह त्यांनी मुश्रीफ गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मुरगूड तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला जे न्याय देतील, त्यांच्यासह राहून सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने रणजितसिंह पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटात जाहीर प्रवेश करत असल्याचे राजेखान जमादार यांनी स्पष्ट केले. त्याच बैठकीत हसन मुश्रीफ यांच्यासोबत काम करत राहणार असल्याचे रणजितसिंह पाटील यांनी जाहीर केले.

Maharashtra Politics
Dry Fruits Price : दिवाळीचा सण आणखी गोड होणार, सुकामेव्याच्या दरात २० टक्क्यांनी घट; वाचा नवे दर

रणजितसिंह पाटील हे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांचे बंधू आणि गोकुळचे माजी अध्यक्ष आहेत. रणजितसिंह पाटील यांचे राजेखान जमादार हे निकटवर्तीय आहेत. प्रवीणसिंह पाटील यांनी हसन मुश्रीफ यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले. त्यानंतर रणजितसिंह पाटील आणि राजेखान जमादार यांनी मुश्रीफ गटात जाण्याची घोषणा केली.

Maharashtra Politics
Thane : ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार; काय आहे सरकारचा प्लान?

मुंबईमध्ये गुरुवारी (९ ऑक्टोबर) रणजितसिंह पाटील आणि राजेखान जमादार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये हे दोन नेते ५०० हून अधिक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Politics
Kalyan : कल्याणकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून सुटका; कल्याणमधील सर्वात मोठा उड्डाणपूल सुरु होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com