Rule Change Saam Tv
बिझनेस

Rule Change: रेपो रेट ते UPI; आजपासून बदलणार या गोष्टी; तुमच्यावर थेट परिणाम होणार

RBI Repo Rate To UPI Rule Change In August 2025: ऑगस्ट महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. आता लवकरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये बदल करु शकतात.

Siddhi Hande

ऑगस्ट महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल

रेपो रेटमध्ये बदल होण्याची शक्यता

यूपीआयचे नियम बदलले

आजपासून ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. यामध्ये यूपीआयपासून ते स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डपर्यंत अनेक नियम बदलले आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. काही बदल आजपासून झाले आहेत. तर काही बदल येत्या काही दिवसात होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ६ ऑगस्ट रोजी पतधोरण बैठक होणार आहे. यामध्ये रेपो रेटबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये रेपो रेट स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर आणखी २५ बेसिस पॉइंट्सने कपा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

UPI च्या नियमांत बदल

आजपासून यूपीआयच्या नियमांत महत्त्वाचे बदल झाले आहेत. आता युजर्संना फक्त ५० वेळा बॅलेंस चेक करता येणार आहे. याचसोबत ऑटोपेच्या नियमांत बदल झाले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नवीन रेपो रेट जाहीर करणार आहे. हा रेपो रेट कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत ६ ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेची बैठक होणार आहे.

आयटीआरची पडताळणी ३० दिवसांत होणार

आयटीआर फाइल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर आयकर विभाग तुमचा आयटीआर पडताळणीसाठी घेऊन. तुम्ही ऑनलाइन आयटीआर फाइल केल्यानंतर ३० दिवसांच्या आता तो वेरिफाय केला जाईल.

स्टेट बँकेच्या कोब्रँडेड क्रेडिट कार्डवर इन्श्युरन्स बंद

स्टेट बँक ऑफ इंडियाने आता स्टेट बँकेच्या कोब्रँडेड क्रेडिट कार्डवर इन्श्युरन्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन निर्णय ११ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT