Repo Rate Saam Tv
बिझनेस

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेणार! रेपो रेटमध्ये कपात करणार? होम लोनवर होणार परिणाम

RBI Repo Rate Annoucement: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उद्या मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक कदाचित रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉइंट्सने कपात करु शकतो.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करणार मोठी घोषणा

रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता

रेपो रेटचा थेट परिणाम तुमच्या होम लोनवर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उद्या मोठा निर्णय घेऊ शकते. रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक सुरु झाली आहे. तीन दिवस ही बैठक असणार आहे. या बैठकीत रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे रेपो रेट बदलणार की नाही हे उद्या समजणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा उद्या रेपो रेटबाबत घोषणा करतील.

रेपो रेटचा थेट परिणाम हा तुमच्या लोनच्या ईएमआयवर होतो.रेपो रेट वाढल्यावर कर्जावरील व्याज वाढते. रेपो रेट कमी झाले तर कर्जावरील व्याज कमी होते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम ईएमआयवर होतो. दरम्यान, याआधी ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. रेपो रेट ५.५० वर स्थिर आहे.

रेपो रेटमध्ये कपात होणार की नाही?

यावेळी रेपो रेटमध्ये कदाचित कपात होऊ शकते. रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉइंट्सने कपात केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे रेपो रेट ५ टक्के होऊ शकतो. याबाबत अधिकृत घोषणा उद्या केली जाईल. मागच्या वर्षभरात रेपो रेट जवळपास १०० बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे.

रेपो रेट म्हणजे काय? (What is RBI Repo Rate)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षभरात दर दोन वर्षांनी पतधोरण बैठक आयोजित केली जाते. यामध्ये रेपो रेट आणि इतर वित्तीय गोष्टींसंदर्भात निर्णय घेतले जातात. रेपो रेटचा परिणाम थेट तुमच्या लोनवर होतो. या रेपो रेटवर आधारित तुमच्या लोनचे व्याजदर ठरवले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT