RBI Repo Rate: होम लोन आणखी स्वस्त होणार; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

RBI Repo Rate May Cut: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे थेट कर्जावरील व्याजदर कमी होईल.
RBI
RBISaam Tv
Published On
Summary

RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

रेपो रेटमध्ये अजून कपात होण्याची शक्यता

रेपो रेट ५.२५ होऊ शकतो

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी पतधोरण बैठक आहे. या बैठकीत निर्णय होण्यात शक्यता आहे. रेपो रेट हा २५ बेसिस पॉइंट्सने कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा रेपो रेट ५.२५ होऊ शकतो.

२०२६ मध्ये रेपो रेट कायम राहतील अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांना आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

RBI
Government Scheme: निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा, तरुणांसाठी सुरु केली नवी योजना; वाचा सविस्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या आठवड्यात सांगितले की, सध्याच्या आर्थिक आकडेवारीवरुन असे दिसून आले की व्याजदरात कपात करण्यासाठी अजूनही वाव आहे. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात जवळपास १०० बेसिस पॉइंट्सने कपात केली. त्यानंतर मागच्या वेळी हे दर स्थिर ठेवले. यानंतर आता पुन्हा हे दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी होऊ शकता.

होम लोन होणार कमी (Home Loan Will Decrease)

रेपो रेटमध्ये बदल झाल्याने त्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहे. होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोन कमी होणार आहे. रेपो रेटचा परिणाम हा व्याजदरावर होतो. रेपो रेट कमी झाल्यावर व्याजदर कमी होते त्यामुळे लोनवरील व्याजदेखील कमी होते. यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार

RBI
8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

अनेक वस्तूंच्या किंमती घसरल्या

सरकारने अन्नधान्याच्या किंमतीत घसरण केली आहे. ग्राहकांच्या गरजेचे अनेक गोष्टींच्या किंमतीवर कर कपात झाली आहे. यामुळे ऑक्टोबरमध्ये भारतातील चलनवाढ ०.२५ टक्क्यांवर पोहचली. यामुळे रुपयांच्या किंमती घसरत असल्या तरीही मध्यवर्ती बँकेला कमकुवत वापराला (Weak Comsumption) पाठिंबा देण्यासाठी जागा मिळाली आहे.

RBI
आता 350 रुपयांची नोट चलनात? RBI लवकरच करणार घोषणा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com