Home Loan Top-Up Saam Tv
बिझनेस

Home Loan Top-Up : होम लोन टॉपअप करण्याचा विचार करताय तर ही बातमी वाचा! RBI ने दिले वेगळेच संकेत

RBI Concerned About Home Loan Top Up : रिझर्व्ह बँक इंडियाने गृहकर्जावर टॉप अप लोन घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात होम लोन टॉप करणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता चलनविषयक धोरणात्मक बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये रेपो रेट कमी होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. परंतु रेपो रेट कमी झाला नाही.दरम्यान, जर तुम्ही भविष्यात गृहकर्ज टॉपअप करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात, असा अंदाज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग ९ वर्षे रेपो रेट ६.५ टक्के ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ईएमआयमध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही. दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास होम लोन टॉप अप करण्याबाबत चिंता वर्तवली आहे.

आरबीआयच्या म्हणण्यांनुसार, सर्वसामान्य लोक जास्त प्रमाणात होम लोन टॉप अप करत आहेत. हा एक चिंतेचा विषय आहे. लोकांची स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक वाढतआहे. त्यामुळे बँकाना लोन देताना सावधगिरी बाळगाला हवी. होम लोन टॉपअप करताना व्यवस्थित पडताळणी करायला हवी, असं आरबीआयने सांगितले आहे.

शक्तिकांत दास यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसापासून होम लोन टॉप करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. बँका आणि nbfc सोन्याच्या कर्जाप्रमाणेच ग्राहकांना होम लोन टॉप अप करुन देत आहे. परंतु कर्जाची रक्कम मालमत्तेच्या किंमतीच्या आत असणे गरजेचे आहे. मात्र ग्राहक या नियमांचे पालन न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे होम लोन टॉप अप करणाऱ्या ग्राहकांना फटका बसू शकतो. अनेक ग्राहक सतत होन लोन टॉप अप करताना दिसत आहे.त्यामुळे दिलेल्या कर्जाचा गैरवापर किंवा वेगळ्याच ठिकाणी वापर होऊ शकतो.या परिस्थितीत बँका आण इतर वित्तीय संस्थांनी या प्रकरणांचा आढावा घेऊन त्यावर कारवाई करायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT