Paytm Payments Bank Saam Tv
बिझनेस

Paytm Payments Bank: मोठी बातमी! पेटीएमचा बँकिंग परवाना रद्द, आरबीआयने का केली कारवाई

RBI Cancels Paytm Payments Bank License: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय

पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना केला रद्द

पेटीएम पेमेंट्स बँकेला कोणतेही व्यव्हार करता येणार नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे.बँकिंग नियमन कायदा, १९४९ अंतर्गत हा परवाना रद्द केला आह. आता पेटीएम पेमेंट्स बँक भारतात कोणत्याही प्रकारचे व्यव्हार करण्यास पात्र राहणार नाहीये.

RBI चा पेटीएम पेमेंट्स बँकेला दणका (RBI Strict Action on Paytm Payments Bank)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासंदर्भात आदेश जारी केले आहे. यामध्ये त्यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेवर का कारवाई केली याबाबत माहिती दिली आहे. ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे महत्त्वाचे पाऊल चलले आहे. ही बँक कायमस्वरुपी बंद व्हावी, मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करता यावेत, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचेही बँकेने सांगितले आहे.

पेटीएम पेमेंट्सचा परवाना रद्द करण्यामागचे कारण काय? (Why RBI Cancel Paytm Payment Bank License)

रिझर्व्ह बँकने म्हटलंय की, पेटीएम पेमेंट्स बँकेला बँकिंग व्यव्हार करण्यास मनाई केली आहे. बँकेचे कामकाज हे बँकेच्या आणि ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक होते, असं आरबीआयने निवेदनात म्हटलं आहे.जनहितासाठी हा निर्णय प्रतिकूल असल्याचेही बँकेने निवेदनात म्हटले आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेचे खराब कामकाज, खातेधारकांना धोका, व्यवस्थापनावरील अविश्वास आणि अटी शर्तींचे पालन न करणे या कारणांमुळे पेटीएम पेमेंट्स बँकेचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतल आहे. याआधीही रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली होती. २०२२ पर्यंत नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली होती. २०२४ पर्यंत खात्यात पैसे जमा करणे बंद केले होते. यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चेंबूर प्रकरणात सर्व अधिकारी निर्दोष; अधिकाऱ्यांना वाचवलं,कंत्राटदारांवर बिल फाडलं

Maharashtra News Live Update: मुंबई- गोवा महामार्ग कशेडी घाटात दरड कोसळली

Wednesday Horoscope : कामात प्रगती होणार; 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यक्तींना पैशाची चणचण जाणवणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana: मतांसाठी लाडकीत 3,500 कोटींचा अपहार; ठाकरेसेना कायदेशीर नोटीस पाठवणार

Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

SCROLL FOR NEXT