RBI approves merger of Emirates NBD’s three Indian branches with RBL Bank saam tv
बिझनेस

मोठी बातमी! देशातील दोन बँकांचं होणार विलीनीकरण; RBI नं दिली मंजुरी

Emirates NBD India Branch Merger with RBL Bank : आरबीआयने एमिरेट्स एनबीडीच्या मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राममधील तीन भारतीय शाखांचे आरबीएल बँकेत विलीनीकरण करण्यास मंजुरी दिलीय. हा निर्णय १ डिसेंबर २०२६ पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खात्यांवर आणि बँकिंग सेवांवर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घ्या.

Bharat Jadhav

बँकिंग क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. १६ ऑक्टोबर रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 'एमिरेट्स एनबीडी बँक'च्या (Emirates NBD Bank) भारतातील तीन शाखांचे 'आरबीएल बँक'मध्ये (RBL Bank) विलीनीकरण करण्यास मंजुरी दिलीय. हा निर्णय १ डिसेंबर २०२६ पासून लागू होईल. त्यानंतर मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राम येथे असलेल्या एमिरेट्स एनबीडी बँकेच्या शाखा, आरबीएल बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत होतील.

जून २०२६ मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) स्थित बँकिंग समूह 'एमिरेट्स एनबीडी' (Emirates NBD) ने 'आरबीएल बँक' (RBL Bank) मधील ६०% हिस्सा अधिग्रहित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. आता या दोन्ही बँकांच्या भारतीय शाखांचे विलीनीकरण हा या व्यवहाराचा पुढचा टप्पा असणार आहे.य यामुळे ग्राहकांच्या मनात प्रश्न आला असेल की, विलीनीकरणाच्या निर्णयामुळे त्यांच्या बँक खात्यांवर, व्यवहारांवर आणि इतर बँकिंग सेवांवर परिणाम होईल. चला तर खात्यावर परिणाम होईल की नाही ते जाणून घेऊ.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 'एमिरेट्स एनबीडी बँक'च्या (Emirates NBD Bank) भारतीय शाखांचे 'आरबीएल बँक'मध्ये (RBL Bank) विलीनीकरण करण्याच्या योजनेला मंजुरी दिलीय. ही मंजुरी 'बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९' च्या कलम ४४ए(४) (Section 44A(4)) अंतर्गत देण्यात आलीय. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार १ डिसेंबर २०२६ पासून 'एमिरेट्स एनबीडी बँक'च्या भारतातील सर्व शाखा 'आरबीएल बँक'च्या शाखा म्हणून कार्यरत होतील. यामुळे दोन्ही बँकांच्या भारतीय कामकाजाच्या एकत्रीकरणाचा मार्ग मोकळा झालाय.

एमिरेट्स एनबीडी ने २६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक

एमिरेट्स एनबीडीने १८ जून २०२६ रोजी आरबीएल बँकेतील (RBL Bank) बहुतांश हिस्सा अधिग्रहित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यासाठी बँकेने सुमारे २.७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीय, जी अंदाजे २६,००० कोटी रुपयांच्या बरोबरीची आहे. या गुंतवणुकीनंतर आरबीएल बँकेच्या विस्तारित भाग भांडवलामध्ये एमिरेट्स एनबीडीचा हिस्सा ६० टक्क्यांवर पोहोचलाय. या व्यवहाराची घोषणा सर्वप्रथम १८ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली होती.

या व्यवस्थेअंतर्गत एमिरेट्स एनबीडीने नवीन शेअर्स खरेदी करून आरबीएल बँकेतील आपला हिस्सा वाढवलाय. आरबीएल बँकेतील हिस्सा संपादन करणे आणि एमिरेट्स एनबीडीच्या भारतीय शाखांचे विलीनीकरण होणे, या दोन स्वतंत्र प्रक्रिया आहेत. हिस्सा संपादनाची प्रक्रिया जून महिन्यात पूर्ण झाली, तर शाखांचे विलीनीकरण डिसेंबर महिन्यापासून लागू होईल.

मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राममधील शाखांचा समावेश असेल

एमिरेट्स एनबीडी सध्या भारतात मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राम येथे असलेल्या तीन शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) २० जानेवारी २०२६ रोजी या प्रस्तावित कराराबाबत तपशील जाहीर केला. या योजनेनुसार एमिरेट्स एनबीडीच्या भारतीय शाखांचे आरबीएल बँकेत विलीनीकरण केले जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर या तीन शाखांचे कामकाज आता आरबीएल बँकेच्या अंतर्गत येईल. परिणामी, १ डिसेंबरपासून या शाखा आरबीएल बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत होतील.

एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल बँकेच्या मते, हा करार भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक आहे. याद्वारे इक्विटी भांडवल उभारणीही करण्यात आलीय. या गुंतवणुकीमुळे आरबीएल बँकेला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अतिरिक्त भांडवल उपलब्ध होईल.

तसेच एमिरेट्स एनबीडीला भारतात आपला विस्तार करण्याची आणि बँकिंग क्षेत्रात आपली उपस्थिती अधिक बळकट करण्याची संधी मिळेल. एमिरेट्स एनबीडी चे प्रादेशिक बँकिंग क्षेत्रातील कौशल्य आणि आरबीएल बँक (RBL Bank) चे भारतातील जाळे यांचा मेळ घातल्यास, व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होऊ शकते, अशी आशा दोन्ही बँकांकडून व्यक्त करण्यात आलीय.

सीसीआयच्या मंजुरीनंतर आरबीआयचा हिरवा कंदील

या व्यवहाराच्या प्रक्रियेसाठी विविध नियामक मंजुऱ्यांची आवश्यकता होती. सीसीआयने २० जानेवारी २०२६ रोजी या प्रस्तावित एकत्रीकरणाला मंजुरी दिली. त्यानंतर १५ मे २०२६ रोजी आरबीएल बँकेने जाहीर केले की, या गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व नियामक आणि सरकारी मंजुऱ्या प्राप्त झाल्या आहेत. जून महिन्यात एमिरेट्स एनबीडीने आपली गुंतवणूक पूर्ण केली. आता १६ ऑक्टोबर रोजी आरबीआयकडून मिळालेल्या मंजुरीनंतर, भारतीय शाखांच्या विलीनीकरणाची तारीखही निश्चित करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 3 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा शनिवारचे राशीभविष्य

टाटा पॉवरचं पाणी दुष्काळग्रस्तांना द्या! वीज निर्मिती थांबवावी, सरकारनं तूट भरून काढावी

लवकरच टेस्लाची हवेत उडणारी कार, ताशी 97 किमी वेगानं उडणार कार

Fact Check: लाडकींना केंद्राकडून महिन्याला 5 हजार? केंद्र सरकारची गाव की बेटी योजना?

BMC कार्यालयाच्या वॉशरूममध्ये दारूच्या बाटल्या; महापालिका कार्यालयात नेमकं चाललंय काय?

SCROLL FOR NEXT