

केंद्र सरकारने आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक पुनर्रचनेला मंजुरी दिली.
सरकारची ३०.४८ टक्के आणि एलआयसीची ३०.२४ टक्के हिस्सेदारी विकली जाणार.
व्यवहारानंतर सरकारकडे १५ टक्के आणि एलआयसीकडे १९ टक्के हिस्सा राहणार.
केंद्र सरकारने IDBI Bankआयडीबीआय बँकेतील आपली मोठी हिस्सेदारी विकण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (CCEA) बँकेच्या धोरणात्मक पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत सरकार ६०.७२ टक्के इक्विटी हिस्सेदारी विकणार आहे. हा करार तब्बल ५२,८७७ कोटी रुपयांमध्ये फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जसोबत ठरलाय.
आयडीबीआय बँकेतील एकूण मालकीपैकी भारत सरकार ३०.४८ टक्के तर एलआयसी ३०.२४ टक्के विकणार आहे. या विक्रीनंतर आता आयडीबीआय बँकेत भारत सरकारची हिस्सेदारी फक्त १५ टक्के राहील. तर एलआयसीची हिस्सेदारी ही १९ टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर सरकारने बँकेच्या खासगीकरणाचा हा घेतलेला सर्वात मोठा दुसरा निर्णय आहे. फेअरफॅक्स फायनान्शियलद्वारे आयडीबीआय बँकेतील हिस्सेदारी खरेदी करणे हा भारतातील वित्तीय सेवा क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक ठरणार आहे.
दरम्यान, २०२२ सालापासूनच आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा विकण्याचा सरकारचा विचार होती. त्यासाठीची योजनाही तयार करण्यात आली होती. परंतु कायदेशीर मान्यता तसेच इतर प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. मार्च महिन्यात बँकेतील हिस्सेदारी विकण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. परंतु बोली कमी मिळाल्याने ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.
सरकारने आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून महत्त्वाचा धोरण ठरवण्यात आले आहे. ग्राहकांचा बँकेवरील विश्वास कायम राहावा यासाठी बँकेचे नाव बदलले जाणार नाही. फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स या कंपनीने केलेल्या गुंतवणुकीला तीन वर्षाचा लॉक इन पिरियड असणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदार तीन वर्षांपर्यंत आपले शेअर हे खुल्या बजारात विकू शकणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.