Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT पास, ७ वेळा स्टार्टअप अपयशी, जिद्द सोडली नाही... उभारली कोट्यवधींची कंपनी;Rapido च्या यशामागची कहाणी वाचा

Siddhi Hande

प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीने प्रत्येक व्यक्ती यशाचे शिखर हे गाठतो. यश मिळवण्याच्या प्रवासात अनेकदा अपयश येते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं म्हटलं जातं. असंच यश रॅपिडोचा संस्थापक पवन गुंटुपल्लीलादेखील आले होते. पवनला एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल ७ वेळा अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र, तो डगमगला नाही त्याने प्रयत्न केले आणि तो यशस्वी ठरला. पवन आज रॅपिडो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा मालक आहे.

पवनने IIT मधून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने परदेशात नोकरी केली. परदेशात पवनला लाखो रुपयांचे पॅकेज होते. परंतु स्वतः चं काहीतरी करायचं म्हणून तो पुन्हा भारतात परतला. भारतात परतल्यानंतर त्याने एक दोन वर्ष अनेक नवनवीन आयडियांवर काम केले. परंतु ते ७ वेळा अयशस्वी ठरले.

रॅपिडोच्या यशाची कहाणी (Rapido Success Story)

पवन गुंटुपल्ली यांनी सांगितले की, ७ वेळा अयशस्वी झाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांना आजूबाजूच्या लोकांना खूप नावे ठेवली. परंतु घरच्यांनी त्यांना खूप साथ दिली. त्यानंतर त्यांनी कॅब प्रोवाइड करणाऱ्या कंपनीची सुरुवात केली. या कंपनीचे नाव त्यांना रॅपिडो (Rapido)ठेवलं.ही कंपनी देशभरातली अनेक शहरांमध्ये कॅब किंवा बाईक प्रोवाइड करते.

रॅपिडोला वेस्टब्रिज कॅपिटलच्या नेतृत्वाखाली ई फंडिग सीरीजमध्ये २०० मिलियन डॉलर मिळाले. ही कंपनीसाठी मोठी गुंतवणूक आहे. रॅपिडो कंपनीचे व्हॅल्युएशन १.१ अरब डॉलर आहे. कंपनी आता युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाली आहे.कंपनी आता आपला विस्तार अजून वाढवणार आहे.

पवनने ६ वेळा स्टार्टअप सुरु केले. परंतु त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने अरविंद सान्का या मित्रासोबत द कॅरियर या कंपनीची सुरुवात केली. हे मिनी ट्रक इंटरसिटी लॉजिस्टिक्सची सेवा देते. परंतु हा बिझनेसदेखील अयशस्वी झाला. त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन पवन यांना नवीन आयडिया सुचली. ट्राफिकमध्ये अडकल्यावर बाइकने माणूस लवकर पोहचतो. त्यामुळे पवन, अरविंद सान्का आणि ऋषिकेश एसआर या मित्रांसोबत मिळून २०१५ साली रॅपिडो कंपनीची सुरुवात केली. आज या कंपनीची मार्केटमध्ये किंमत ९२३७ कोटी रुपये आहे.

ओला-उबरला मोठी टक्कर (Rapido Competition With OLA And Uber)

रॅपिडो मार्केटमध्ये येताच ओला आणि उबर या कंपन्यांचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. ओला आणि उबर कंपनी फक्त कार आणि टॅक्सी सर्व्हिस देतात. परंतु बाइकची सेवा देणारी रॅपिडो ही एकमेक कंपनी होती. या रॅपिडोच्या राइडसाठी बेस फेयर १५ रुपये ठेवण्यात आले. १ किलोमीटर अंतपरासाठी फक्त ३ रुपये शुल्क आकारण्यात आले. यामुळे ग्राहकांना कंपनीच्या बाइक सर्व्हिसला जास्त पसंती दिली. कंपनी आता मार्केटमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT