Amol Kale Death: MCA अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Amol Kale News In Marathi: क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. अमोल काळे यांचे निधन झाले आहे.
Amol Kale Death: MCA अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
amol kaletwitter

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले आहे. ते अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.

अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. रविवारी (९ जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत- पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी अमोल काळे देखील उपस्थित होते. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत या सामन्याचा आनंद घेतला.

Amol Kale Death: MCA अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर नसीम शाहला अश्रू अनावर! ढसाढसा रडतानाचा Video व्हायरल

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांसह त्यांची प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख होती. नवीन तंत्रज्ञान, लोकांचा विकास, परदेशी व्यवसाय आणि भारतातील प्रवेश सेवांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं. यासह त्यांनी जगभरातील नावाजलेले नेते आणि स्टार्टअप यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित केले होते.

Amol Kale Death: MCA अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
IND vs PAK: दारुण पराभवानंतर बाबर आझमला राग अनावर! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com