Railway Rule Saam Tv
बिझनेस

Railway Rule: आता रेल्वेतून फक्त ३५ किलोच सामान नेता येणार; विमानासारखा नियम होणार लागू

Railway Rule For Luggage: रेल्वेने प्रवास करण्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला रेल्वेतून फक्त ३५ किलो सामान नेता येणार आहे. रेल्वेने लगेजसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

Siddhi Hande

रेल्वेचा लगेजसंदर्भात नवा नियम

आता रेल्वेतून फक्त ३५ किलो वजन घेऊन जाता येणार

जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त सामान नेले तर दंड भरावा लागणार

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वेने प्रवास करताना सामाना नेण्यासाठी मर्यादा टाकली जाणार आहे. विमानात जसे सामान नेण्यासाठी वजनाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तशीच आता रेल्वेने प्रवास करतानादेखील निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही त्यापेक्षा जास्त सामान नेले तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. (Railway New Rule For Luggage)

रेल्वेतून आता फक्त ३५ किलोचे वजन तुम्हाला नेता येणार आहे. रेल्वे मंडळाचा "लगेज" बाबत नियम लागू केला आहे. लवकरच होणार या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. रेल्वेतून प्रवास करताना आता विमानाप्रमाणेच प्रवाशांना ठरवून दिलेल्या वजनाएवढे सामान बरोबर नेता येणार आहे, तसा नियमच रेल्वे मंडळाने केला आहे

सुरुवातीला काही रेल्वे स्थानकांवर या नियमांची अंमलबजावणी केली जाईल. सामानाचे वजन तपासल्यानंतरच प्रवाशांना पलाटावर प्रवेश मिळेल. त्यानंतर सर्व रेल्वेसाठी हा नियम लागू केला जाईल.पहिल्या टप्प्यात प्रयाजगराज, मिर्झापूर, कानपूर, अलिगड येथे हा नियम लागू होईल. त्यानंतर देशात सर्वत्र हा नियम लागू केला जाईल.

कोचनुसार सामानाची मर्यादा (Railway Luggage Limit)

जनरल कोचमध्ये तुम्हाला फक्त ३५ किलो सामान नेता येणार आहे

स्लीपर कोचमध्ये ४० किलो सामानाची मर्यादा

एसी थ्रीमध्ये ४० किलो सामान नेता येणार आहे.

एसी टू कोचमध्ये ५० किलो वजनाचे सामान नेता येणार आहे

एसी फर्स्ट कोचमध्ये ७० किलो वजनाचे सामान नेता येणार आहे.

हा नियम याआधीही निश्चित केला होता. परंतु त्याकडे आता काटेकोरपणे लक्ष दिले जाणार आहे. याचसोबत बॅगेचा आकारदेखील निश्चित केला जाणार आहे. एका व्यक्तीकडे फक्त ५० किलो वजनाचे सामान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांसाठी दोन पक्षांची युती, एकत्र लढणार, पुढच्या बैठकीत ठरणार प्लान

Maharashtra Politics: गणपती दर्शनाआधी एकनाथ शिंदे–राज ठाकरे यांची बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा|VIDEO

Maharashtra Live News Update: उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानींचा आत्महत्येचा प्रयत्न

Maharashtra Government: राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, टप्पा अनुदानाला मंजुरी

Mithila Palkar: मिथिला पालकरच्या सौंदर्याची जादू, साडीतील फोटोंनी केले घायाळ

SCROLL FOR NEXT