Railway Recruitment 2026 Saam Tv
बिझनेस

Railway Recruitment: रेल्वेमध्ये मिळवा चांगल्या पगाराची नोकरी, ३५४८ पदांसाठी होणार भरती; अर्ज कुठे अन् कसा करायचा?

Indian Railway Job: रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये ३५४८ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेविषयी जाणून घ्या सर्वकाही...

Priya More
  • रेल्वे एनटीपीसी ग्रॅज्युएट भरतीअंतर्गत ३५४८ पदे भरण्यात येणार आहेत

  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२६ आहे

  • अर्जात दुरुस्ती ९ ते १८ नोव्हेंबरदरम्यान करता येणार आहे

सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने एनटीपीसी ग्रॅज्युएट भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ३५४८ पदं भरली जाणार आहेत. तिकीट सुपरवायझर, सिनिअर क्लर्क, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि ज्युनिअर अकाऊंट्स असिस्टंट कम टाइपिस्ट या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

रेल्वेने या भरती प्रक्रियेसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ८ ऑक्टोबरपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. http://www.rrbapply.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये सर्वात जास्त २७५० पदं गुड्स ट्रेन मॅनेजरची आहेत. रेल्वेच्या या सर्व पदांवर ज्यांची निवड होणार आहे त्यांना पगार देखील चांगला मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता पूर्ण केलेली असावी. उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण/EWS उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९४ पूर्वी झालेला नसावा, OBC नॉन-क्रिमी लेयर उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९१ पूर्वी झालेला नसावा आणि SC/ST उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९८९ पूर्वी झालेला नसावा, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ८ ऑक्टोबर म्हणजे आजपासून सुरू झाली. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर आहे. महत्वाचे म्हणजे इच्छुक उमेदवारांना अर्जामध्ये दुरूस्ती देखील करता येणार आहे. त्यांना ९ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत दुरूस्ती करण्याची संधी असेल.

निवड प्रक्रिया ही सीबीटी १, सीबीटी २, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, गुणवत्ता यादी यानुसार केली जाणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ५०० रुपये फी द्यावी लागेल. अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांना २५० रुपये फी द्यावी लागेल.

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला मूळ वेतन किती मिळणार याची देखील माहिती समोर आली आहे.

- तिकीट सुपरव्हायझर - ३५,४०० रुपये

-गुड/ ट्रेन मॅनेजर- २९,२०० रुपये

- कनिष्ठ लेखा सहाय्यक / टंकलेखक - २९,२०० रुपये

- वरिष्ठ लिपीक सहाय्यक / टंकलेखक - २९,२०० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: ओपन पोर्स कमी करुन चेहरा होईल नॅचरल ग्लोईंग, फक्त रात्री झोपताना ५ मिनिटांत लावा हा होममेड जेल

Maharashtra News Live Update: मनरेगाच्या प्रलंबित बिलांवरून शेतकऱ्यांचा संताप; जिल्हा परिषदेसमोर मुंडन करून श्राद्ध आंदोलन

50 प्रभागांमधील निवडणुका रद्द! 6 महिन्यात पुन्हा निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश; कारण काय?

Business Ideas For Women: महिलांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी, हे १० बिझनेस जे तुम्ही घरातून करू शकता

अडीच कोटींची देयकं,कर्जाचा डोंगर अन् कंत्राटदाराचा टोकाचा निर्णय; अमरावतीत खळबळ

SCROLL FOR NEXT