

मालेगावातील कथित बोगस शिक्षक-कर्मचारी भरती प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई.
कीर्ती पाथरे या प्रमुख संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त.
बनावट गुणपत्रिका, मान्यता आदेश आणि शालार्थ आयडी तयार केल्याचा संशय तपासाच्या केंद्रस्थानी.
अजय सोनावणे, साम प्रतिनिधी
नाशिकच्या मालेगाव शहरातील महात्मा फुले शिक्षण संस्था बहुचर्चित बोगस शिक्षक-कर्मचारी भरती प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत मुख्य संशयित कीर्ती पाथरे याला संगमेश्वर येथून काल सायंकाळी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शिक्षण व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.आज त्याला मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले. संशयित पाथरे याने बोगस कर्मचारी भरतीसाठी लागणारी बनावट कागदपत्रे व अधिकृत आदेश तयार केले.
इयत्ता १० वी आणि १२ वीची बोगस गुणपत्रके तयार करण्यासह थेट मंत्रालय, शिक्षण संचालनालय तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयाचे बनावट मान्यता आदेश आणि खोटे शालार्थ आयडी बनवून दिल्याचा गंभीर संशय त्याच्यावर आहे.या प्रकरणी छावणी पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. यापूर्वीही काही संशयितांवर कारवाई झाली असून, पाथरे याच्या अटकेमुळे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार आणि संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बोगस शिक्षक-कर्मचारी भरती प्रकरणाचा तपासात शालार्थ आयडी प्रमाणपत्र, दहावी-बारावी नियुक्ती प्रमाणपत्र, शिक्षणअधिकाऱ्यांच्या नियुक्ती आदेश, मंत्रालयाचे नियुक्ती आदेश हे सर्व बनावट असल्याचं समोर आलंय. हे बनावट प्रमाणपत्र बनवणारा किर्ती शेखरराव पात्रे हा दलाल आहे. याला काल नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.