IRCTC ने नवीन नियम केले लागू
बनावट युजर्स आयडीवरुन तिकीट बुकिंग रोखण्यासाठी मोठे पाऊल
तब्बल २.५ कोटी युजर आयडी केले निष्क्रिय
भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग सिस्टीममधील दुरुपयोग रोखण्यासाठी निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC)ने २.५ कोटींपेक्षा जास्त आयडी निष्क्रिय केले आहेत. बनावट युजर्स ओळखल्यानंतर त्यांचे आयडी निष्क्रिय करण्यात आले आहेत. याबाबत सरकारने माहिती दिली आहे.
ही खाती निष्क्रिय करण्यापूर्वी तात्काळ तिकिटे बुक करण्यात अनेक समस्या येत होत्या. अनेकदा असे निदर्शनास आले आहे की, तत्काळ बुकिंग विंडो उघडल्यानंतर काही मिनिटांतच तिकिटे बुक केले जातात. कारण, एजंट बॉट्स वापरुन तिकिटे बुक करत असत.ज्यामुळे सामान्य नागरिक तिकिटे बुक करु शकत नव्हते. या बदलानंतर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारने काय माहिती दिली?
सरकारने संसदेत सांगितले की, तिकीट बुकिंग सिस्टीममधील अनियमितता रोखण्यासाठी आयआरसीटीसीने अलीकडे २.५ कोटींहून युजर आयडी निष्क्रिय करण्यात आले आहेत. हे युजर आयडी संशयास्पद आढळले होते. सरकारने सांगितले की, भारतीय रेल्वेने कन्फर्म तिकीट बुकिंग आणि डिजिट तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी काही बदल केले आहेत.
रेल्वेचे हे नियम बदलले (Railway Rule)
आरक्षित तिकिटे ऑनलाइन किंवा संगणीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली काउंटरवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Service) तत्वावर बुक करता येतात.
एकूण तिकिटांपैकी ८९ टक्के ऑनलाइन बुक केली जात आहे.
पीआरएस काउंटवर डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
१ जुलै २०२५ पासून ही तिकिटे IRCTC वेबसाइट आणि अॅपद्वारे फक्त आधार पडताळणी केलेल्या युजर्ससाठी बुक केले जाऊ शकतात.
तात्काळ आरक्षण सुरु झाल्यानंतर ३० मिनिटांत एजंटना तात्काळ तिकीटे बुक करण्यास मनाई आहे.
आपत्कालीन कोट्यातही बदल
सरकारने आपत्कालीन कोट्यातही बदल केले आहेत. आपत्कालीन कोट्याअंतर्गत तिकीट बुक करण्यासाठी प्रवासाच्या दिवशी अर्ज करता येतो. परंतु आपत्कालीन कोट्यातून तिकीट बुक करण्यासाठी एक दिवस आधी अर्ज करतावा लागतो. हा कोटा, खासदार, उच्च अधिकारी, वैदयकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
आयआरसीटीसीने किती युजर आयडी निष्क्रिय केले आहेत?
आयआरसीटीसीने सुमारे २.५ कोटी युजर आयडी निष्क्रिय केले आहेत जे बनावट असल्याचे आढळले होते.
तत्काळ बुकिंगसाठी काय नवे नियम आहेत?
तत्काळ आरक्षण विंडो सुरु झाल्यानंतर ३० मिनिटांपर्यंत एजंटना तिकीट बुकिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
आधार पडताळणीची अट कधीपासून लागू झाली?
१ जुलै २०२५ पासून फक्त आधार पडताळणी केलेले युजर्सच तिकीट बुक करू शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.