मुंबई-पुण्यातील प्रवास महागणार, ५० टक्क्यांची वाढ होणार, ओला-उबरच्या संपानंतर सरकार घेणार मोठा निर्णय

Ola and Uber cabs Cab Fare Hike : मुंबई आणि पुण्यातील शहरातील ओला आणि उबरचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. चालकांच्या संपानंतर राज्य सरकारने दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Mumbai-Pune Cab Rides to Cost 50% More After Ola-Uber Strike
Mumbai-Pune Cab Rides to Cost 50% More After Ola-Uber Strike
Published On
Summary
  • मुंबई-पुण्यातील कॅब प्रवास ५०% महागण्याची शक्यता

  • ओला-उबर संपानंतर सरकारकडून भाडेवाढीचा प्रस्ताव

  • दरवाढीमुळे ड्रायव्हर्सना नफा आणि प्रवाशांना फटका

Ola and Uber cabs News : मुंबई आणि पुणे या दोन शहरातील अॅप-आधारित प्रवास ५० टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. ओला आणि उबरच्या संपानंतर राज्य सरकारकडून आधारभूत भाड्यामध्ये ५० टक्क्यांच्या दरवाढीचा प्रस्ताव सूचवला आहे. गुरुवारी राज्य सरकार आणि ओला-उबर यांच्यामध्ये चर्चा झाली. एका अधिकाऱ्याने याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. चालक युनियन्सच्या संपानंतर दरवाढीमध्ये ही सुधारणा सुचवण्यात आली आहे. अॅप-आधारित कॅब भाडे आणि पारंपरिक 'काळी-पिवळी' टॅक्सी भाड्यांमध्ये समानतेची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. (Mumbai-Pune Cab Rides to Cost 50% More After Ola-Uber Strike)

अॅप-आधारित प्रवासात आधारभूत भाड्यामध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्यास मुंबई आणि पुण्यातील प्रवासाची किंमत वाढेल. मुंबईमध्ये कॅबचा दर प्रति किलोमीटर १६ रुपयांवरून २४ रुपये होईल. पुण्यातही प्रति किलोमीटर १२ रुपयांवरून १८ रुपये होईल. ही दरवाढ झाल्यास मुंबई, पुण्यात कॅबने प्रवास करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. हजारो प्रवाशांवर याचा परिणाम होऊ शकतो.

Mumbai-Pune Cab Rides to Cost 50% More After Ola-Uber Strike
दलित तरुणाला विवस्त्र करत बेदम मारहाण, खामगावात संतापजनक प्रकार

युनियनचा दबाव

युनियनच्या दबावामुळे भाडेवाढीची शिफारस करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या दरांमुळे ड्रायव्हर्सना योग्य तो नफा मिळू शकत नाही, त्यामुळे उपजीविका मिळवणे जवळपास अशक्य आहे, असा युक्तिवाद चालक संघटनांनी केला आहे. यापूर्वीच्या चर्चेत सरकारने ओला आणि उबरकडून भाडे सुधारणांबाबत लेखी हमी घेण्याचे आश्वासन दिले होते.

आता करण्यात आलेली ही शिफारस त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठीचे पहिले औपचारिक पाऊल आहे, असे मध्यस्थीतील एका अधिकाऱ्याने सांगितले. चालकांनी अधिक पारदर्शक कमाई आणि कमी प्लॅटफॉर्म शुल्कासह चांगल्या कामाच्या परिस्थितीची मागणीही केली आहे.

Mumbai-Pune Cab Rides to Cost 50% More After Ola-Uber Strike
Mumbai 26th July : मुंबईकरांनो सावधान! पुन्हा २६ जुलैचा धोका, समुद्रकिनारी जाणं टाळा, IMD कडून मुसळधारेचा इशारा

हजारो प्रवाशांच्या खिशावर परिणाम होणार -

प्रवाशांसाठी, भाडेवाढीमुळे छोट्या अंतरांसाठीही दैनंदिन प्रवास खर्चात मोठी वाढ होऊ शकते. या घडामोडींना संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, काहीजण ड्रायव्हर्सना योग्य वेतनाची गरज पाठिंबा देत आहेत, तर काहींनी परवडण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुंबई आणि पुण्यातील ओला-उबरचा प्रवास आता महागण्याची चिन्हे आहेत. लवकरच याबाबत अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल.

Mumbai-Pune Cab Rides to Cost 50% More After Ola-Uber Strike
सरकारी काम, सहा महिने थांब... शिक्का पुसला जाणार, KDMC मध्ये राज्यातील पहिला प्रयोग, १५ ऑगस्टपासून सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com