Railway Fare Hike Saam Tv
बिझनेस

Railway Fare Hike : रेल्वेने तिकीट दर वाढवले! स्लीपर, AC ते नॉन एसीचा प्रवास महागला; जाणून घ्या नवीन किंमत

Railway Ticket Fare Hike: रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. मेल एक्सप्रेस, एसी आणि नॉन एसी ट्रेनच्या तिकीट दरात वाढ केली आहे.

Siddhi Hande

रेल्वेच्या तिकीट दरात वाढ

मेल एक्सप्रेस, एसी आणि नॉन एसी तिकीटात वाढ

२१५ किमीपेक्षा जास्त पल्ल्याच्या ट्रेन तिकीटात वाढ

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने मेल एक्सप्रेसच्या तिकीट दरात वाढ केली आहे. हे नवीन दर २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे ट्रेनच्या तिकीट दरात वाढ केली आहे. यामुळे आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

रेल्वेचे हे नवीन तिकीट दर २६ डिसेंबर २०२६ पासून लागू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सामान्य क्लासमधून २१५ किलोमीटरपेक्षा कमी अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नाही.

२१५ किलोमीपेक्षा जास्त लांब प्रवास करणाऱ्या तिकीट दरात प्रति किलोमीटर १ पैशांनी वाढ केली आहे. मेल एक्स्प्रेम, नॉन एसी आणि एसी क्लाससाठी प्रति किलोमीटर २ पैशांनी वाढ केली आहे.

तिकीट दर वाढल्याने कोट्यवधींची कमाई (Railway Ticket Fare Hike)

भारतीय रेल्वेद्वारे तिकीट दर वाढल्याने रेल्वेची चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. ट्रेन तिकीट दरात वाढ झाली आहे जर ५०० किलोमीटरचा प्रवास तुम्ही नॉन एसी ट्रेनने करत असाल तर त्यापेक्षा १० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

दिल्ली ते मुंबई प्रवास महागला (Delhi Mumbai Train Fare Hike)

रेल्वेद्वारे निश्चित केलेल्या तिकीट दरानुसार आता दिल्ली ते मुंबईपर्यंतचा प्रवास महागणार आहे. दिल्ली ते मुंबई हे अंतर १३८६ किलोमीटर आहे. सध्या सीएसएमटी राजधानी एक्सप्रेसचे ३ एसीचे तिकीट ३१८२ रुपये आहे. यामध्ये २ रुपये प्रति किलोमीटर हिशोबाने २७ रुपये जास्त द्यावे लागणार आहे. ट्रेनचे तिकीच ३२०७ रुपये होईल.

या वर्षभरात दोनदा झाली तिकीट दरात वाढ

भारतीय रेल्वेने या वर्षभरात दोनदा तिकीट दरात वाढ केली आहे. जुलै महिन्यात याआधी तिकीट दर वाढवले होते. त्यानंतर आता वर्ष संपताना तिकीट दरात वाढ केली आहे. मेल एक्सप्रेस, एसी, नॉन एसी रेल्वेच्या तिकीट दरात वाढ केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूरमध्ये भूमाफियांकडून सर्रासपणे डोंगर खोदण्याचं काम सुरू

KDMC Politics: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत राजकीय उलथापालथ, मनसेच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचा महापौर होणार?

Shiv Sena : पुन्हा तारीख पे तारीख; शिवसेना कुणाची? आता या दिवशी होणार सुनावणी

Celebrity Mangalsutra Design: दीपिका ते कियारा; बॉलिवूड अभिनेत्रीच्या 'या' नाजूक मंगळसूत्रांची सध्या सोशल मीडियावर क्रेझ

यावर्षी किती लाख कोटींचे सामंजस्य करार होणार? थेट दावोसहून उदय सामंत EXCLUSIVE

SCROLL FOR NEXT