रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाती बातमी
RailOne अॅपवरुन तिकीट बुक केल्यास मिळणार ३ टक्के डिस्काउंट
१४ जानेवारीपासून सुविधा सुरु
आता ट्रेनचं तिकीट बुक करताना तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. ट्रेन तिकीत बुकिंग करताना ३ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. आज म्हणजेच १४ जानेवारीपासून ही सुविधा सुरु झाली आहे. याच फायदा प्रवाशांना होणार आहे. तुम्ही रेल्वेचं तिकीट बुक करत असाल तर तुमचे पैसे वाचणार आहे.
रेल्वेने प्रवाशांसाठी नवीन RailOne अॅप सुरु केलं आहे. यावरुन जर तुम्ही तिकीट बुक केले तर तुम्हाला हा डिस्काउंट मिळणार आहे. याआधी तुम्ही जेव्हा R-वॉलेट मधून पेमेंट करत होता तेव्हा तुम्हाला हा डिस्काउंट मिळत होता. आता या अॅपवरुन तिकीट बुक केल्यास ३ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
१४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ पर्यंत ही सेवा सुरु राहणार आहे. यामध्ये कॅशबॅक मिळणार आहे. जर ही योजना यशस्वी झाली तर पुढे भविष्यात हा डिस्काउंट असाच ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,आर वॉलेटवरील सध्याच्या ट्रान्झॅक्शनवरील ३ टक्के डिस्काउंटमध्ये कोणताही बदल होणार नाही.
RaiOne App वर तिकीट बुक कसं करायचं? (How to Book Ticket on Railone App)
सर्वात आधी RaiOne App अॅप डाउनलोड करा.
यानंतर IRCTC/UTS ID वापरुन लॉग इन करा.
यानंतर होम स्क्रिनवर अनारक्षित तिकीट असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर ज्या स्टेशनवर जायचे आहे तो पर्याय निवडायचा आहे.
यानंतर तिकीटाचा प्रकार आणि कोणासाठी तिकीट बुक करायचे ते निवडा.
यानंतर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे पेमेंट करायचे आहे.
हे तिकीट तुम्हाला सेव्ह करायचे आहे.
RailOne अॅपवरच मिळणार फायदा
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फायदा फक्त RailOne अॅप वापरणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. यामध्ये ३ टक्के डिस्काउंट मिळणारआहे. ऑनलाइन माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.