PM Matritva Vandana Yojana Saam Tv
बिझनेस

Matru Vandana Yojana: गरोदर महिलांना मिळतात ६००० रुपये; मातृ वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Matru Vandana Yojana For Pregnant Women: गरोदर महिलांसाठी केंद्र सरकारने खास योजना राबवली आहे. मातृ वंदना योजनेत महिलांना ६००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात महिला, लहान मुलांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी खास योजना राबवली आहे. केंद्र सरकारने मातृ वंदना योजना राबवली आहे. या योजनेत गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळते.

बाळाच्या जन्माआधी महिलांना आर्थिक मदत देणे हा आहे. यामुळे गर्भवती महिलांना आणि बाळांना आवश्यक पोषण मिळण्यास मदत होईल. या योजनेत महिलांना ६,००० रुपये दिले जातात. (Matru Vandana Yojana)

मातृ वंदना योजनेत महिलांना पहिल्या बाळाच्या जन्मावेळी पैसे दिले जातात. हे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होतात. हे ६००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. पहिल्या हप्त्यात १००० रुपये दिले जातात. यासाठी गरोदर महिलेचे नोंदणी अंगणवाडी केंद्रात करावी लागेल. पहिल्या तीन महिन्यातच ही नोंदणी करायची आहे. (Matru Vandana Yojana For Pregnant Women)

दरम्यान, दुसऱ्या हप्त्यात पुन्हा २,००० रुपये दिले जातात. हे पैसे सहाव्या महिन्याच्या शेवटी दिले जातात. यासाठी महिलांनी गर्भावस्थेतील तपासणी (प्री नेटल चेकअप) केलेले असावे.यानंतर तिसऱ्या हप्त्यात पुन्हा २००० रुपये मिळतात.हे पैसे बाळाच्या जन्मानंतर दिले जाते. बाळाचे लसीकरण झाल्यावर तुम्हाला हे पैसे मिळतील. यासाठी तुमच्याकडे बाळाचे नोंदणी प्रमाणपत्र असायला हवे.

पात्रता

मातृ वंदना योजनेत अर्ज करणारी महिला भारताची रहिवासी असावी. फक्त गरोदर महिलांनाच मिळतो. या योजनेत लाभार्थी महिलेचे वय १९ वर्षांपेक्षा जास्त असावे. सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलेकडे पतीचे आणि तिचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: BCCI मुळे जसप्रीत बुमराहचं २ कोटींचं नुकसान

Maharashtra Live News Update: डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात, खालापूरजवळ कारचा चेंदामेंदा अन् रक्ताचा सडा, ३ जणांचा मृत्यू

Husband And Wife Gudi Padwa Celebration: लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे? नवरा-बायकोने 'या' 5 गोष्टी केल्यास संसारात वाढेल प्रेमाचा गोडवा

Pune Police : धक्कादायक! पुण्यातील लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण; CCTV मध्ये प्रकार कैद

SCROLL FOR NEXT