Pm Matru Vandana Yojana: केंद्र सरकारची गरोदर महिलांसाठी खास योजना! मिळणार ६ हजार रुपये; काय आहे मातृ वंदना योजना ? जाणून घ्या

pm matru vandana yojana apply : भारतातल्या गर्भवती स्त्रियांना केंद्र सरकार काही योजना मार्फत आर्थिक मदत करत आहे. त्यातीलच एक योजना म्हणजे मातृ वंदना योजना.
pm matru vandana yojana apply
Pm Matru Vandana Yojana yandex
Published On

भारतातल्या महिलांसाठी सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात १ जानेवारी २०१७ पासून करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA)तसेच २०१३ च्या कलम ४ अंतर्गत तरतुदींनुसार ही योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक हातभार मिळला आहे. ही योजना गरोदर मातांसाठी आहे. त्यात त्यांच्या बाळाला ही वेतन मिळते. यात पहिल्या मुलाच्या बाबतीत ५००० रुपयांची रक्कम आणि दुसऱ्या अपत्यासाठी, ६००० रुपयांचा लाभ तुम्ही घेवू शकता.

वेतन किती मिळते?

केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेत स्त्रियांना चांगलाच लाभ मिळतो. यात गरोदर माता , स्तनदा माता आणि नवजात बालकांना यात लाभ मिळतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत महिलांना ५००० रुपये मिळतात. यात तीन टप्पे असतात.

पहिल्या टप्प्यात नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये रक्कम मिळते. दुसऱ्या टप्प्याने गर्भधारणेला ६ महिने झाले की २ हजार रुपये मिळतात. तिसऱ्या टप्प्यात प्रसुतीनंतर बाळाच्या पहिल्या लसीकरणानंतर २ हजार रुपये मिळतात.

pm matru vandana yojana apply
Tea Shop Business : चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

या योजनेचा लाभ कोण कोण घवू शकतं?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गरोदर महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहे. ज्या महिला अंशत: ४० टक्के अपंग आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्याचसोबत ज्या महिलांकडे ई-श्रम कार्ड आहे त्या महिला याचा लाभ घेऊ शकतात. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असेल त्या या योजनेत सहभाग घेवू शकतात.

अर्ज कुठे भरायचा?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ १९ वर्षावरील गर्भवती महिलांना घेता येतो. या योजनेचा अर्ज तुम्ही https://wcd.delhi.gov.in/wcd/pradhan-mantri-matru-vandana-yojana-pmmvy या अधिकृत वेब साईटवर जावून भरु शकता. त्यात तुमच्याकडे आधारकार्ड , बाळाच्या जन्माचा दाखला , रहिवासी दाखला , जात प्रमाणपत्र, पॅनकार्ड या कागदपत्र असायला हवी.

Edited by : Sakshi Jadhav

pm matru vandana yojana apply
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा हप्ता 'या' तारखेला होणार जमा; बघा VIDEO

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com