पुणे शहरातील झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. रुग्णसंख्या 66 वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांच्या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मुसळधार पाऊस, अस्वच्छता आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचं दिसून येत आहे. गंभीर बाब म्हणजे यामध्ये 26 गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे.
नुकतंच बावधन येथील 22 आठवड्यांच्या गर्भवती तरुणीला झिका विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. पुणे शहरात 20 जूनपासून एकूण 26 गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे. झिका झालेल्या आणि संशयीत बाधित गर्भवती महिलांना घाबरण्याचे कारण नाही. त्यांनी गर्भाची स्थिती जाणुन घेण्यासाठी अनोमेनिया स्कॅन करावे. अशी सूचना आरोग्य विभागानं केली आहे.
झिका झाल्यास काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया
आराम करा
डिहायड्रेशन टाळा
भरपूर पाणी प्या
ताप आणि वेदना शमण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या
झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखा एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्राणघातक नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो. यामुळे गर्भवती महिलांना तपासणी करून सतत दक्ष राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.