Sambhajinagar News : आधी लाथाबुक्या, मग फोडल्या काचा; पैसे मागितल्यावरुन मेडिकल चालकाला तरुणांकडून बेदम मारहाण

Chhatrapati Sambhajinagar Crime News : औषधांचे पैसे मागितले यावरुन रागाच्या भरात टोळीने एका मेडिकल चालकाला मारहाण केली. पुढे त्यांनी मेडिकलच्या काचाही फोडल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime CCTV Footage
Chhatrapati Sambhajinagar Crime CCTV FootageSaam Tv
Published On

माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या सायगव्हाण गावात एका मेडिकल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. औषध घेण्याचे कारण सांगत पाच ते सहा जणांच्या टोळीने मेडिकलमध्ये प्रवेश केला आणि मेडिकल चालकावर एकत्र हल्ला केला. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. तोडफोड करणाऱ्यांवर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल चालक हा बंजारा समाजातील आहे. सकाळी दहाच्या सुमारास आरोपींपैकी एक मेडिकलमध्ये येऊन गोळी घेऊन गेला. पैसे मागितल्यावर आरोपीने मेडिकल चालकाला जातीवर शिव्या दिल्या. पैसे न देता शिवीगाळ करत आरोपी तेथून निघून गेला. त्याने सकाळीदेखील मेडिकल चालकाला मारहाण केली.

त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास प्रमुख आरोपी त्याच्या साथीदारांना घेऊन मेडिकलमध्ये आला. त्यांनी मेडिकल चालकाला मारायला सुरुवात केली. जोरात एकाच वेळी पाच ते सहा जणांनी हल्ला केल्याने मेडिकल चालक खाली पडला. सर्वांनी त्यांच्यावर अजून जोराने हल्ला चढवला. काहींनी रागाच्या भरात मेडिकलच्या काचा फोडल्या. औषधांची नासाधूस केली. जाता-जाता त्यांनी मेडिकल चालकाच्या भावाला देखील धमकी दिली.

Chhatrapati Sambhajinagar Crime CCTV Footage
Shahapur Crime News : शिक्षकच बनला भक्षक, वर्गात एकटीला गाठत केलं भयानक कृत्य

हा सर्व प्रकार मेडिकल जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. सीसीटीव्ही फुटेज घेत मेडिकल चालकाने पोलिस ठाणे गाठले. त्याने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या मारहाणीच्या प्रकरणामधील आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime CCTV Footage
Raigad News : बापलेकीच्या नात्याला काळीमा! वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 7-8 वर्षांपासून सुरू होता छळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com