Shahapur Crime News : शिक्षकच बनला भक्षक, वर्गात एकटीला गाठत केलं भयानक कृत्य

Thane Crime News : ठाण्याच्या शहापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. एका आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.
shahapur school principal molestation female student
shahapur school principal molestation female studentSaam Tv
Published On

फैयाज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Thane Crime News : ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्याच्या शहापूरमधील एका आश्रमशाळेत अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे पीडित मुलीने आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकानेच हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहापूर तालुक्यातील टाकी पठार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने तिच्या मुख्याध्यापकावर विनयभंगाचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुख्याध्यापक प्रभाकर जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडितने आईवडिलांना अत्याचाराबद्दल सांगितले. त्यांनी त्यानंतर लगेच पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सध्या अकरावी इयत्तेत आहे. तिच्यावर १८ जानेवारी रोजी अत्याचार झाला. ती लेझीम खेळून वर्गात परतली होती. तेव्हा तिच्या पाठोपाठ मुख्याध्यापकांनी देखील वर्गात प्रवेश केला. वर्गात कोणी नसल्याचा फायदा उचलून त्यांनी पीडितेवर अत्याचार केला.

shahapur school principal molestation female student
Crime : पुणे हादरलं! मित्रासोबत दारू पार्टी करायला गेला, नकळत बंदुकीचा ट्रिगर दबला अन् विपरीत घडलं

झालेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. तिने सर्वकाही घरी आई आणि वडिलांना सांगितला. पुढे पीडितेच्या पालकांनी किन्हवली पोलीस स्थानक गाठत मुख्याध्यापकाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. पुढे पोलिसांनी मुख्याध्यापक जाधवला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास करायला सुरुवात केली.

shahapur school principal molestation female student
Pune Doctor ends life : आई,वडील आणि दादा...मला माफ करा; पुण्यातील डॉक्टर तरुणीचा मृत्यूला कवटाळण्यापूर्वीचा संदेश मन हेलावून टाकणारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com