प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूकीचा वेगवेगळा मार्ग निवडत असतात. यामध्ये अनेकांना कमीत कमी कालावधीत जास्त गुंतवणूक हवी असते. परंतु यामध्ये खूप मोठा रिस्क असते. त्यामुळे तुमचे पैसे बुडण्याची शक्यता असते. त्यापेक्षा तुम्ही लाँग टर्मसाठी सरकारी योजनेत गुंतवणूक करा.सरकारी योजनेत कोणत्याही प्रकारची रिस्क नसते. तुमचे पैसे सुरक्षित असतात.
PPF योजनेतील गुंतवणूक (PPF Investment)
पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Public Provident Fund). पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. या योजनेत सध्या तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही दिवसाला ३३ रुपये गुंतवले तर तुम्ही ३ लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळवू शकतात.
रोज ३३ रुपये गुंतवा अन् लाखो रुपये मिळवा (Invest 33 daily and Get 3 lakh Rupees)
या योजनेत तुम्ही वार्षिक गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही वर्षाला १२००० रुपये गुंतवायचे आहेत. म्हणजेच महिन्याला १००० रुपये तुम्हाला गुंतवावे लागणार आहे. याचाच अर्थ असा की, तुम्हाला दिवसाला ३३.३३ रुपये जमा करायचे आहेत. या योजनेत तुम्हाला ७.१ टक्के व्याजदरानुसार ३,२५,४५७ रुपये मिळणार आहे.
पीपीएफ योजनेत मॅच्युरिटीचा कालावधी १५ वर्षांचा आहे. त्यामुळे १५ वर्षात तुमचे पैसे डबल होती. या योजनेत तुम्ही दिवसाला ३३ रुपयेनुसार १५ वर्षात १८०००० रुपये गुंतवणार आहे. यावर ७.१ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला व्याजाचे १,४५,४५७ रुपये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी ३,२५,४५७ रुपये मिळणार आहे.
पीपीएफ योजनेतील व्याजदर
पीपीएफ योजनेतील व्याजदर हे बदलत असते. त्यामुळे हे व्याजदर वाढू शकते किंवा कमीदेखील होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला या योजनेत फक्त फायदाच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे व्याजदर बदलले नाहीत. परंतु ७.१ टक्के व्याजदरानेही तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.