PPF Scheme Saam Tv
बिझनेस

PPF Scheme: दररोज फक्त १०० रुपये गुंतवा अन् ₹१० लाख मिळवा; PPF योजनेत मिळतोय डबल परतावा

PPF Scheme Investment: तुम्ही जर गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर पीपीएफ ही उत्तम योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला गुंतवणूकीपेक्षा डबल परतावा मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकाला आपल्या मुलांची काळजी असते. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आतापासूनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.जर तुम्ही आतापासून चांगली गुंतवणूक केली तर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जर तुम्ही रोज १०० रुपये गुंतवले तर तुम्हाला १० लाख रुपये मिळणार आहेत.

१५ वर्षांसाठी करा गुंतवणूक

जर तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. ही योजना १५ वर्षांनी मॅच्युअर होणार आहे. या योजनेत तुम्हाला चक्रव्याढ व्याजदेखील मिळते. त्यामुळे मिळणाऱ्या व्याजावरदेखील तुम्हाला व्याज मिळणार आहे. या योजनेतील गुंतवणूक ही भविष्याच्या दृष्टीने नेहमी फायदेशर आहे.

कमीत कमी गुंतवणूक अन् जास्त परतावा

या पीपीएफ (PPF Scheme) योजनेत तुम्ही वर्षाला ५०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. तुम्ही वर्षाला जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करु शकतात. या योजनेत सध्या ७.१ टक्के व्याजदर मिळते. हे व्याजदर बदलत असते. त्यामुळे हे व्याजदर वाढूदेखील शकते. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होणार आहे.

या योजनेत जर तुम्ही रोज १०० रुपये गुंतवले तर महिन्याला ३००० रुपये गुंतवणार आहेत. म्हणजेच वर्षाला ३६००० रुपयांची गुंतवणूक तुम्ही करणार आहेत. १५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत हिशोब केला तर तुम्हाला ९,७६,३७० रुपये मिळणार आहेत. यातील ५.४० लाख ही गुंतवणूक केलेली रक्कम असेल तर त्यावर ४,३६,३७० रुपये व्याज मिळणार आहे.

२० वर्षात मिळणार १५ लाख

या योजनेत जर तुम्ही २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर डबल परतावा मिळणार आहे. यामध्ये ७,२०,००० रुपये तुम्ही जमा करणार आहात. त्यावर तुम्हाला ८,७७,९८९ रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला १५,९७,९८९ रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT