Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, फक्त व्याजातूनच मिळणार २ लाख रुपये; जाणून घ्या कसे?

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये अनेक सरकारी योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना आणि एफडीमध्ये नागरिक गुंतवणूक करतात.अशीच एक पोस्ट ऑफिसची योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत नागरिकांना कमीत कमी गुंतवणूकीत जास्तीत जास्त नफा मिळतो. या योजनेत सरकारकडून चांगले व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध नागरिक गुंतवणूक करु शकतात. या योजनेत गुंतवणूकीवर चांगला परतावा आणि कर सूटदेखील मिळते. या योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक करायची असते.पाच वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकीवर तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकतात. यामध्ये १ वर्ष,२ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी पैसे जमा करु शकतात. या योजनेत तुम्ही जर १ वर्षासाठी गुंतवणूक केली तर ६.९ टक्के व्याज मिळेल. २ किंवा ३ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७ टक्के व्याजदर मिळते. जर तुम्ही ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७.५ टक्के व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही जर ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला ठेवीवर २ टक्के व्याज मिळेत. तुम्हाला २४,९७४ रुपये व्याज मिळेल. तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ७,२४,९७४ रुपये मिळतील. त्यामुळे तुम्ही फक्त व्याजातून २ लाख रुपये कमवू शकतात.

या योजनेत आयकर कायदा 1961च्या 80C अंतर्गत कर सवलत मिळते. या योजनेत तुम्हाला सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडता येईल. यामध्ये किमान १००० रुपये गुंतवून खाते उघडता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video Viral: 'बाप तो बाप रहेगा' गाण्यावंर पूजा खेडकर यांच्या वडिलांचा भन्नाट डान्स, पाहा Video

Cabinet Decision : कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 24 मुद्दे

Pune News : मुळा नदीत मृत माशांचा खच; रसायन मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा परिणाम

Jayant Patil : जयंत पाटलांची महायुतीवर टीका, VIDEO

Richa Chadha : रिचाच्या घरी येणार एक नवा पाहुना

SCROLL FOR NEXT