Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: ११४ महिन्यात तुमचे पैसे होणार डबल; पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळतो जबरदस्त परतावा

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे डबल होणार आहेत. या योजनेत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी किंवा अडचणीच्या काळासाठी गुंतवणूक करत असतात. ही गुंतवणूक तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळवून देईल.तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करायची आहे. या गुंतवणूकीवर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही एक बचत स्कीम आहे. या योजनेत अनेक नागरिकांनी गुंतवणूक केली. या योजनेतील गुंतवणूकीवर बॅकेपेक्षाही जास्त व्याजदर मिळते. या योजनेत ७.५ टक्के व्याज मिळते.

व्याजदर

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या टेन्योरसाठी गुंतवणूक करु शकतात. १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर ६.९ टक्के व्याज मिळते. २ किंवा ३ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७ टक्के वयाज मिळते. ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेत तुमचे पैसे डबल होऊ शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल.

वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत जर तुम्ही ५ वर्षासाठी ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते. म्हणजेच तुम्ही २,२४,९७४ रुपये गुंतवणार आहात. त्यावर व्याजदर लागू होऊन तुम्हाला मॅच्युरिटीनंतर ७,२४,९७४ रुपये मिळणार आहेत. जर तुम्ही ९.६ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला डबल रक्कम मिळणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला ११४ महिन्यात डबल पैसे मिळणार आहेत.

टॅक्समध्ये सूट

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते. या योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपये गुंतवणूक अकाउंट उघडू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New GST Rates : चैनीच्या वस्तू महागणार! ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू? सर्व यादी एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: राज्य सरकारच्या जीआरविरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन

Duty Hours Increase: कामगारांसाठी महत्वाची बातमी! कामाचे तास वाढले, यापुढे ९ ऐवजी १२ तासांची ड्युटी

Maharashtra Dam : राज्यातील धरणांत ८५ टक्के साठा, मराठवाडा ते कोकण, कुठे किती जलसाठा?

भरधाव कारची ट्रकला धडक; पाच बिझनेसमॅनचा जागीच मृत्यू, रात्री भीषण अपघाताचा थरार

SCROLL FOR NEXT