PM Vidyalaxmi Scheme: शिक्षणासाठी कोणत्याही हमीशिवाय १० लाखांचे कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना आहे तरी काय?

PM Vidyalaxmi Scheme For Educaion Loan: केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी खास पीएम विद्यालक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत उच्च शिक्षणासाठी कोणत्याही हमीशिवाय १० लाखांचे लोन मिळते.
PM Vidyalaxmi Scheme
PM Vidyalaxmi SchemeSaam Tv
Published On

सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यात महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी खास योजना राबवल्या आहे. अनेक बँका, पोस्ट ऑफिसदेखील अनेक योजना राबवत असतात. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. बँक ऑफ बडोदाने विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

PM Vidyalaxmi Scheme
E Shram Card: सरकार देतंय २ लाखापर्यंतचा अपघात विमा, लवकर काढून घ्या 'हे' कार्ड

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यांच्या फीसाठी आर्थिक मदत केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही हमीशिवाय तुम्हाला कर्ज मिळणार आहे. बँक ऑफ इंडियाने हा महत्त्वाचा उपक्रम सुरु केला आहे.

अनेकदा आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे शिक्षण घेता येत नाही. हेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्जदार बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊनदेखील अर्ज करु शकतात. शैक्षणिक कर्जासाठी तुम्हाला कर्ज मिळणार आहे.

PM Vidyalaxmi Scheme
MSSC Scheme: पोस्टाची 'ही' योजना होणार बंद? मिळतंय भरघोस व्याज; गुंतवणूकीसाठी उरले १५ दिवस

पीएम विद्यालक्ष्मी या योजनेत काहीही तारण न ठेवता हमीशिवाय कर्ज दिले जाणार आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल असणार आहे.यामध्ये सर्वसाधारणपणे १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जातात. या कर्जाची परतफेड तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १ वर्षाच्या कालावधीनंतर करु शकतात.

या योजनेसाठी तु्म्ही विद्यालक्ष्मी पोर्टलवर जा. त्यानंतर लॉग इन करा आणि शिक्षण कर्जावर क्लिक करा. यानंतर तुम्ही विविध बँकांच्या कर्जाचे व्याज बघून अर्ज करा.

PM Vidyalaxmi Scheme
Government Scheme: बोअरवेलसाठी सरकारकडून मदतीचा हात! शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com