E Shram Card: सरकार देतंय २ लाखापर्यंतचा अपघात विमा, लवकर काढून घ्या 'हे' कार्ड

E Shram Card Benefits: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे. आपण त्या योजनेबद्दल जाणून घेऊ या.
E Shram Card
E Shram CardYandex

How To Register Online E Shram Card

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड (E Shram Card) योजना सुरू केली होती. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. आर्थिक मदतीव्यतिरिक्त, सरकार ज्या व्यक्तीकडे ई-श्रम कार्ड आहे, त्यांना 2 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ देखील देतं. या योजनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या. (marathi news)

ई-श्रम कार्डधारक पीएम श्रम योगी मानधन योजना, स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय सामाजिक योजना यासारखे लाभ घेऊ (E Shram Card Benefits And Registration) शकतात. त्यांच्यासाठी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना देखील उपलब्ध आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ई-श्रम कार्डविषयी सविस्तर माहिती

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांना ई-श्रम कार्ड मिळू शकते. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीमध्ये, सेल्समन/हेल्पर, ऑटो चालक, चालक, पंक्चर दुरुस्ती करणारे, मेंढपाळ, दुग्धव्यवसाय करणारे, सर्व पशुपालक, पेपर फेरीवाले, Zomato आणि Swiggy, Amazon, Flipkart चे डिलिव्हरी बॉय, मजूर अशा सर्वांचा समावेश आहे.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगाराला 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळते. याचा अर्थ असा की, जर एखादा कामगार अपघाताचा बळी ठरला तर 2 लाख रुपयांची रक्कम दिली (E Shram Card Benefits) जाते. अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीसाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. तसेच मोबाईल नंबर आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

E Shram Card
Post Office Scheme: पोस्टाची ही योजना करणार मालामाल, भरघोस व्याज मिळणार; कसं ते जाणून घ्या

ई-श्रम कार्डचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन

  • ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, eshram.gov.in.

  • होम पेजवर 'रजिस्टर ऑन ई-श्रम' पर्यायावर क्लिक करा. (E Shram Card Online Registration)

  • नवीन पेज उघडल्यावर, विनंती केलेली माहिती भरा.

  • माहिती भरल्यानंतर, आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो टाका.

  • आता नोंदणी फॉर्म दिसेल. तो पूर्णपणे भरा.

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही, हे एकदा तपासून पहा.

  • आता फॉर्म सबमिट करा.

  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 अंकी ई-श्रम कार्ड जारी केले जाते.

E Shram Card
Schemes For Woman: खुशखबर! महिलांना आता स्वत:चा व्यवसाय सुरू करता येणार, जाणून घ्या सरकारच्या 'या' दमदार योजना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com