Post Office Scheme: पोस्टाची ही योजना करणार मालामाल, भरघोस व्याज मिळणार; कसं ते जाणून घ्या

Post Office Time Deposite Scheme : प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. लोक अनेक सरकारी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसची नागरिकांसाठी टाइम डिपॉझिट ही योजना आहे.
Post Office Schemes
Post Office SchemesSaam Tv

Post Office Time Deposite Scheme Benefits:

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. लोक अनेक सरकारी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसची नागरिकांसाठी टाइम डिपॉझिट ही योजना आहे. ज्यात गुंतवणूक करुन तुम्ही जवळपास ९०,००० रुपयांचे व्याज मिळवू शकता.

टाइम डिपॉझिट ही योजना सरकारद्वारे राबवली जाते. या योजनेत गुंतवणूकीवर ६.९ टक्के ते ७.५ टक्के व्याजदर दिला जातो. या योजनेत तुम्ही २ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला पाच वर्षानंतर ९० हजार रुपये व्याज मिळू शकते. (Latest News)

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट तुम्ही ४ वेगवेगळ्या कालावधीसाठी उघडू शकतात. या योजनेअंतर्गत १ वर्षाला ६.९ टक्के व्याज, २ वर्षासाठी ७.० टक्के व्याज तर ३ वर्षासाठी ७.१ टक्के व्याजदर दिले जाते. याचसोबत ५ वर्षासाठी ७.५ टक्के व्याजर दिले जाते. या योजनेत तुम्ही किमान १००० रुपये गुंतवू शकतात.

जर एखाद्या नागरिकाने टाइम डिपॉझिट या योजनेत ५ वर्षांसाठी २ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला एकूण ८९,९९० रुपये व्याज मिळेल. पाच वर्षानंतर तुम्हाला गुंतवणूकीची रक्कम आणि व्याज मिळेल.

Post Office Schemes
Petrol Diesel Rate (23rd Feb 2024) : गुड न्यूज! कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरुच, पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग?

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर कर सवलती मिळतात. या योजनेत 80C अंतर्गत गुंतवणूकीवर सूट आहे. या योजनेत लोक एक तसेच संयुक्त खाते उघडू शकतात.

Post Office Schemes
Vivo Y200e 5G :50MP चा दमदार कॅमेरा अन् पॉवरफुल फीचरसह Vivo Y200e 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com