Schemes For Woman: खुशखबर! महिलांना आता स्वत:चा व्यवसाय सुरू करता येणार, जाणून घ्या सरकारच्या 'या' दमदार योजना

Govt Schemes For Woman: महिलांसाठी खुशखबर आहे. त्यांना आता स्वत:चा व्यवसाय सुरू करता येणार आहे. यासाठी सरकार मदत करत आहे.
Schemes For Woman
Schemes For WomanYandex

Schemes For Woman Loan Facilities

गेल्या काही वर्षांत भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना (Govt Schemes) सुरू केल्या आहेत. महिलांना सक्षम बनविणे आणि त्यांना योग्य सामाजिक सन्मान प्रदान करणे, हा यामागे सरकारचा हेतु आहे. सरकार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.  (latets business news)

सरकारच्या अशा काही योजना (Schemes For Woman) आहेत, ज्याद्वारे महिला आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. आपण या योजना कोणत्या आहेत, त्या कशाप्रकारे मदत करतात हे सविस्तर जाणून घेऊ या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिलांसाठी मुद्रा कर्ज

महिलांना त्यांच्या व्यवसायात आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकारने महिलांसाठी मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. ब्युटी पार्लर, ट्यूशन सेंटर, किंवा अन्य एखादा व्यवसाय तुम्हाला या योजनेअंतर्गत सुरू करता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काहीही तारण ठेवण्याची गरज नाही. या अंतर्गत तीन प्रकारे कर्ज (Govt Schemes For Woman) मिळते. शिशु कर्जाची रक्कम जास्तीत जास्त 50 हजार रुपये असते. किशोर कर्जाची रक्कम 50 हजार रुपये ते कमाल 5 लाख रुपये असते. त्यानंतर तिसऱ्या श्रेणीतील कर्जाची रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत असते.

अन्नपूर्णा योजना

सरकारच्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, भारत सरकार महिला उद्योजकांना अन्न-संबंधित व्यवसायांमध्ये 50,000 रुपयांपर्यंत कर्ज देते. उधार घेतलेली रक्कम भांडी, मिक्सर ग्राइंडर, हॉट केस, टिफिन बॉक्स, वर्किंग टेबल इत्यादी कामाची उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. कर्ज मंजूर झाल्यानंतर, पहिल्या महिन्याचा ईएमआय भरावा लागत नाही. कर्जाची रक्कम 36 मासिक हप्त्यांमध्ये परत करावी (Woman Loan Facilities) लागेल. बाजार दर आणि संबंधित बँकेच्या आधारे व्याजदर ठरवला जातो.

Schemes For Woman
Old Pension Yojana: २००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ‘पेन्शन योजना’ लागू करावी, सत्यजीत तांबे यांनी राज्य सरकारला केली मागणी

स्त्री शक्ती योजना

सरकारची स्त्री शक्ती योजना ही महिलांसाठीची एक वेगळ्या प्रकारची सरकारी योजना आहे. ही योजना महिला उद्योजकांना काही सवलती देऊन आधार (sarkari yojana) देते. या महिला उद्योजकांना त्यांच्या राज्य सरकारच्या EDP (उद्योजकता विकास कार्यक्रम) अंतर्गत नावनोंदणी करावी. यामध्ये 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर काही अंशी व्याज सवलत मिळते.

स्टँड अप इंडिया योजना

स्टँड अप इंडिया योजनेची सुरुवात 2016 मध्ये झाली होती. ही योजना महिला आणि एससी-एसटी प्रवर्गातील लोकांसाठी सुरू करण्यात आलेली ( Woman Entrepreneurs) आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. महिला आपला स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. कर्ज फक्त उत्पादन, सेवा, कृषी संबंधित उपक्रम किंवा व्यवसाय क्षेत्रासाठी दिले जाते.

Schemes For Woman
PM Samman Nidhi Yojana: पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार; या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com