Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार २०,००० रुपये; आताच करा गुंतवणूक

Post Office Senior Citizen Scheme: पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटीजन स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला २०,००० रुपये मिळू शकतात.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिसची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम

दर महिन्याला मिळणार २० हजार रुपये

योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी आतापासूनच आर्थिक बचत करतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होतो. तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळते. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. ही योजना खूप सुरक्षित असणार आहे. या योजनेत सरकार स्वतः गॅरंटी देते. या योजनेत एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. या योजनेत ८.२ टक्के व्याजदर दिले जाते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला टॅक्स बेनिफिटदेखील मिळतात. तुम्हाला या योजनेत फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करायची असते. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाखांपर्यंत सूट मिळते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांचा आहे. या योजनेत जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्यांचे अकाउंट बंद करुन रक्कम नॉमिनीला दिली जाते. या योजनेत दर ३ महिन्याला व्याजदर दिले जाते.

पोस्ट ऑफिसच्या योजनेत ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत दर महिन्याला तुम्ही २०,००० रुपये मिळवू शकतात.

दर महिन्याला २० हजार मिळणार

पोस्टाच्या योजनेत सिंगल अकाउंटमध्ये १५ लाख रुपये जमा करु शकतात. जॉइंट अकाउंटमध्ये ३० लाख रुपये मिळू शकतात. या योजनेत ८.२ टक्के व्याज मिळते. ३० लाखांवर तुम्हाला १२,३०,००० रुपये व्याज मिळते. या योजनेत दर तीन महिन्याला ६१,५०० रुपये मिळतात. त्यामुळे महिन्याला २०,५०० रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

SCROLL FOR NEXT