Investment Tips | Post Office Scheme For Senior Citizens Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना, जेष्ठ नागरिकांना व्याजातून मिळणार लाखो रुपये

Post Office Scheme For Seniour Citizen: नियमित उत्पन्न मिळावं, या उद्देशाने पोस्ट ऑफिसने एक जबरदस्त योजना सुरू केली आहे. ही एक चांगला परतावा देणारी योजना आहे.

Rohini Gudaghe

Senior Citizen Post Office Savings Scheme

पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना आहेत, या योजना आपल्याला चांगला परतावा देतात. अशीच एक योजना ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( Savings Scheme) आहे. ही योजना पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवत आहे. या योजनेत ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, असे लोकं पैसे गुंतवू शकतात. आपण या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (latest sarkari yojana)

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये (Senior Citizen Savings Scheme) तुम्ही किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणूकदार या योजनेमध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो. म्हणजेच ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतरचे पैसे सरकारच्या या योजनेत गुंतवू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत सूट मिळते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योजना वृद्धांसाठी फायदेशीर

सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावं, या उद्देशाने पोस्ट ऑफिसची (Post Office Scheme) ही योजना बनवण्यात आली आहे. ही योजना व्हीआरएस घेतलेल्यांसाठी देखील फायदेशीर आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा सध्या व्याजदर 8.2 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत एकत्रितपणे 5 लाख रुपये जमा केल्यास त्यांना प्रत्येक तिमाहीत 10 हजार 250 रुपये मिळू शकतात.

पाच वर्षात फक्त व्याजातून 2 लाख रुपये मिळतात. जर 30 लाख रुपये या योजनेमध्ये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 2 लाख 46 हजार 000 रुपये व्याज मिळते. म्हणजेच मासिक आधारावर 20,500 रुपये (Post Office Saving Scheme) आणि तिमाही आधारावर 61,500 रुपये मिळतात.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे

ज्येष्ठ नागरिक बचत योजना भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक छोटी बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना आयकर कायदा कलम 80C अंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट (Investment Tips) मिळते. या योजनेत दरवर्षी 8.2 टक्के दराने व्याज मिळते.

ही योजना गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर (Latest Utility News) आहे. यामध्ये दर 3 महिन्यांनी व्याजाचे पैसे गुंतवणूक दाराला मिळतात. दरवर्षी जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी खात्यात व्याज जमा केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT