Child Insurance: मुलांच्या शिक्षणाचं अन् लग्नाचं टेन्शन मिटलं! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत मिळतेय ३ लाख रूपयांपर्यंतची मदत

Bal Jeevan Bima Yojana: मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये गुंतवणूक केल्यानं पालकांना चांगला परतावा मिळतो. या परताव्याच्या मदतीने ते मुलांचं शिक्षण, लग्न यांसारखे मोठे खर्च सहज भागवू शकतात.
Bal Jeevan Bima Yojana
Bal Jeevan Bima YojanaSaam Tv
Published On

Child Insurance Post Office Scheme

पालकांवर मुलांचं संगोपन, भविष्यातील खर्च, शिक्षण, लग्न या सगळ्या गोष्टींची जबाबदारी (Child Insurance Scheme) असते. त्यासाठी पालक नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैसे कमवत असतात. हे सर्व पालकांसोबत घडते. (latest sarkari yojana)

केवळ मासिक कमाईतून हा सगळा खर्च भागवणं खूप कठीण आहे. म्हणूनच स्मार्ट पालक गुंतवणूकीचा पर्याय निवडतात. याच पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिस योजना जीवन विमा संरक्षण प्रदान करते. चांगला हमी परतावा देखील देते. आज आपण या योजनेबद्दल (Bal Jeevan Bima Yojana) जाणून घेऊ या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाल जीवन विमा योजना

पोस्ट ऑफिसची (Post Office Scheme) बाल जीवन विमा योजना पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत येते. ही योजना खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५ ते २० वर्षे वयोगटातील मुलाचा जीवन विमा उतरवता येतो. कोणताही पालक जास्तीत जास्त दोन मुलांसाठी हा विमा घेऊ शकतो. ही योजना घेताना पालकांचं कमाल वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावं लागतं.

ही पॉलिसी घेताना कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नाही. पॉलिसी स्वीकारल्याबरोबर मुलाला विमा (Child Insurance) संरक्षण मिळते. पॉलिसी घेतल्यानंतर पालकाचा मृत्यू झाल्यास, प्रीमियम भरावा लागत नाही. पॉलिसी पूर्ण झाल्यावर बोनसची रक्कम विमा रकमेसह दिली जाते.

Bal Jeevan Bima Yojana
Stree Shakti Yojana: महिलांना व्यवसायात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारची जबरदस्त योजना, मिळणार २५ लाखांचं कर्ज

बाल जीवन विमा योजनेचा फायदा

यामध्ये कमाल ३ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले (Post Office Scheme Benefits) जाते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम पेमेंटचा पर्याय निवडू शकता. बाल जीवन विम्यामध्ये प्रत्येक हजार रुपयांच्या विमा रकमेवर प्रति वर्ष ५२ रुपये बोनस दिला जातो.

जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी गुंतवणुकीचं नियोजन करण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची बाल जीवन विमा योजना हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर गरजांसाठी लाखो रुपये वाचवू शकता.

Bal Jeevan Bima Yojana
PM Kisan Yojana : एकाच घरातील दोन सदस्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल का? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com