Financial Tips: मुदत विमा योजना आणि जीवन विमा योजना यात काय फरक आहे?

Term And life Insurance : जीवन विमा आणि टर्म मुदत विमा लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. बहुतेक लोक तुम्हाला विमा घेण्याचा सल्ला देत असतात. या दोन जीवन विमा पॉलिसीपैकी कोणती पॉलिसी तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते? या लेखात आम्ही दोघांमधील मुख्य फरक आणि त्यांचे फायदे समजून घेऊ.
Term And life Insurance
Term And life InsuranceSaam

Term And life Insurance :

जीवनात अनिश्चितता खूप असते यामुळे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सदैव तयार असले पाहिजे. आपण प्रत्येक प्रकारची आपत्ती टाळू शकत नाही, परंतु आपण त्या आपत्तीचा आर्थिक भार नक्कीच कमी करू शकता. यासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे. हे आर्थिक नियोजन करण्यासाठी काही विमा पॉलिसी तुम्हाला मदत करतील. जीवन विमा, आणि टर्म विमा या पॉलिसी तुम्हाला आर्थिक नियोजनासाठी मदत करतील. या दोघांमध्ये काय फरक आहे, हे जाणून घेऊन.. (Latest News)

टर्म इन्शुरन्स

टर्म विमा एक असा जीवन विमा टर्म इन्शुरन्स हा जीवन विमा योजनेचा एक प्रकार आहे. यात एका विशिष्ट कालावधीसाठी विमा संरक्षण मिळते. यात लोकांना एक हप्ता भरावा लागतो. हप्ता किती रुपयांचा असावा हे आपल्याला निवडता येते. जर हा विमा चालू असताना काही दुर्घटना झाली तर तुमच्या कुटुंबाला एक निश्चित राशी दिली जाते. याला डेथ बेनिफिट म्हटलं जातं. हा विमा दीर्घकाळासाठी घेतलं जातं. यात कोणतेच रिटर्न मिळत नाही.

लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय?

जीवन विमा पारंपारिक जीवन विम्याप्रमाणे असते. यामध्ये तुम्हाला जीवन विम्याच्या सुरक्षिततेसह गुंतवणुकीचा लाभ मिळतो. ही एक अष्टपैलू पॉलिसी असून यात गुंतवणुक करता येते. लाइफ इन्सुरन्स घेतला असेल तर आणि त्या दरम्यान कोणत्याही कारणाने लाइफ इन्शुरन्स घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम आणि गुंतवणुकीचे फायदे मिळतात. त्याची मुदत संपल्यानंतर तुम्हाला म्यॅच्युरिटीचा लाभ म्हणून एक ठरावीक रक्कम मिळते.

मृत्यू लाभ

टर्म इन्शुरन्स

टर्म इन्शुरन्समध्ये मृत्यू झाल्यानंतर फक्त विमा रक्कम दिली जाते. यामुळे विमा धारकाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळत असते.

लाइफ इन्शुरन्स : लाइफ इन्शुरन्समध्ये डेथ बेनिफिट रक्कमसह गुंतवणुकीच्या सुरक्षाही देत असते. हा संपूर्ण जीवनभर विमा चालू असते. जर पॉलिसी धारकचा मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक लाभ होत असतो.

कवरेज काय असते

टर्म इन्शुरन्सची रचना केवळ आर्थिक संरक्षणासाठी केलीय. ही एक साधी विमा योजना आहे , यात केवळ मृत्यू कवच आहे. कोणतीही गुंतवणूक नसते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com